28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेष'IC 814' चा दहशतवादी प्रवाशांना म्हणाला होता, 'इस्लाम धर्म स्वीकारा!

‘IC 814’ चा दहशतवादी प्रवाशांना म्हणाला होता, ‘इस्लाम धर्म स्वीकारा!

अपहरणातून वाचलेल्या पूजा कटारियाने सांगितली कहाणी

Google News Follow

Related

‘IC 814 : द कंदाहार हायजॅक’ ही वेबसीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. मात्र, प्रदर्शित होताच वेबसीरिजवर अनेक टीका झाल्या, नावात बदल केल्यामुळेही चर्चा झाली, यातील अनेक खऱ्या घटना दाखवल्या नसल्याचा आरोपही केला गेला, या ‘अत्यंत गंभीर घटनेचे’ सर्वात ‘अव्यावसायिक चित्रण’ असल्याचेही म्हटले गेले. वेबसीरिजमुळे नवनवीन खुलासे, माहिती समोर येत आहे. याच दरम्यान, अपहरणातून वाचलेल्या एका प्रवाशाने आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. पाच दहशतवाद्यांपैकी एकाने, ‘इस्लाम धर्म स्वीकारा, हिंदू धर्मापेक्षा चांगला आहे, असे म्हटल्याचे प्रवाशाने सांगितले.

पूजा कटारिया असे प्रवाशाचे नाव आहे. पूजाने नुकतीच इंडिया टुडेला मुलाखत दिली आणि सात दिवसांच्या अपहरणाच्या दरम्यान घडलेल्या त्रासदायक घटनांची आठवण करून दिली. पूजा आणि राकेश कटारिया हे जोडपे हनिमूनहून घरी परतत होते. त्याच वेळी ही घटना घडली. तसेच दहशतवाद्यांमधील बर्गर नावाच्या व्यक्तीने पूजा यांना भेट म्हणून शाल दिली होती. त्यावर माझ्या प्रिय बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला माझ्याकडून भेट असे लिहिले होते, याचा देखील उल्लेख त्यांनी आपल्या मुलाखतीत केला आणि भेटीची शाल दाखविली.

हे ही वाचा :

सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद!

बहराइचमधील लांडग्यांना पकडण्यासाठी ‘टेडी बिअर’चे जाळे !

पॅरालिम्पिकमध्ये २१ वे पदक; महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन खिलारीला गोळा फेकमध्ये रौप्य

सोनिया ISI च्या एजण्ट नाहीत; मग, केजीबीच्या आहेत का ?

मुलाखतीदरम्यान पूजाने सांगितले, वेबसिरीजमध्ये ज्या घटना दाखवल्या आहेत, त्या खऱ्या आहेत. बर्गर, डॉक्टर, चीफ, भोला आणि शंकर ही नावे देखील खरी आहेत. याच नावाने ते अतिरेकी हाक मारत होते. ही त्यांची सांकेतिक नावे होती.

त्या पुढे म्हणाल्या, यामधील जो डॉक्टर होता, तो शिकलेला होता, त्याच्या बोलण्यावरूनच समजत होत. त्याने आम्हाला तीन-चार वेळा सांगितले की, तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारा, इस्लाम धर्म खूप चांगला आहे, तुमच्या हिंदू धर्मापेक्षा चांगला आहे, अनेकांना त्यांचे बोलणे पटले होते. यामध्ये बर्गरनावाचा दहशतवादी खेळीमेळीने राहत होता, आमच्याशी अंताक्षरी खेळत होता. त्यानंतर एकदा चीफने आम्हाला सांगितले तुम्हाला सर्वांना मारेल जाईल, कारण तुमचे सरकार काहीही करत नाही. मात्र, सर्व काही बदललं आणि आमची सुटका झाली. यावेळी पूजा यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यावेळेचे, टीकेट्स, शीतपेयाचे कॅन, टूथपेस्ट आधी वस्तू जतन करून ठेवलेल्या दाखविल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा