भारतीय बनावटीचे अत्याधुनिक विमान हवाई दलात सामिल होणार

भारतीय बनावटीचे अत्याधुनिक विमान हवाई दलात सामिल होणार

भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाला सुरूवात म्हणून मेक इन इंडिया अंतर्गत पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या निर्मितीच्या प्रकल्पाला मोदी सरकारने परवानगी दिली आहे. हे पाचव्या पिढीचे ॲडव्हान्स्ड मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) आहे.

या विमानाचे प्रारूप आणि पहिले प्रोटोटाईप बनविण्यासाठी जवळपास ₹१५,००० कोटींचा खर्च येणार आहे. त्यानंतर या पहिल्या विमानाचे उत्पादन सुमारे सात ते आठ वर्षात सुरू करता येईल.

हे ही वाचा:

अमृता फडणविस यांनी केले ठाकरे सरकारला लक्ष्य

शरद पवारांचे काँग्रेसला थेट आव्हान, तरीही आघाडीत सर्वकाही आलबेल?

तुम्ही गृहमंत्री होणार का? या प्रश्नावर काय म्हणाले जयंत पाटील?

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार या प्रकल्पाची माहिती असलेल्या काहींच्या मते, भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणासाठी २०३२ पर्यंत २४० स्टेल्थ विमानांच्या (सहा स्क्वाड्रन्स) सामिल करून घेण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. स्टेल्थ विमानांमुळे भविष्यातील हवाई युद्धासाठी भारत सक्षम होईल.

या सहा स्क्वाड्रनपैकी पहिल्या दोन स्क्वाड्रन एमके-१ प्रकारची एएमसीए विमाने असतील तर त्यानंतरच्या चार स्क्वाड्रनमध्ये एमके-२ प्रकारची विमाने असतील. ती सहाव्या पिढीची विमाने असतील. असे काही अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

एमके-१ जातीच्या विमानांमध्ये अमेरिकेच्या जीई-४१४ इंजिनांचा वापर केलेला असेल. मात्र एमके-२ विमानांसाठी भारतीय बनावटीच्या इंजिनांचाच वापर केला जाणार आहे. डीआरडीओच्या प्राधान्यावर सध्या एएमसीए सगळ्यात वर आहे आणि भारतीय हवाई दल देखील या प्रकल्पाच्या खंबीरपणे पाठीशी आहे. असे आणखी एका अधिकाऱ्याकडून कळले आहे.

एअरो इंडिया २०२१ मध्ये भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी डीआरडीओ एएमसीएमध्ये सहाव्या पिढीची भारतीय बनावटीची उपकरणे वापरण्याचे ठरवले आहे. त्यांनी सांगितले की एएमसीएमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह घातक हत्यारे, रणगाडा विरोधी मिसाईल, अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा इत्यादी यंत्रणा असतील.

भारतीय हवाई दलाचे निवृत्त उप-प्रमुख मनमोहन बहादुर यांनी सांगितले की, यामुळे भारतीय संरक्षण आणि संशोधन तंत्रज्ञानात एका वेगळ्याच उंचीवर पोहोचणार आहे. या प्रकल्पाचे वेळापत्रक पाळले जाणे आवश्यक आहे कारण यात उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे आणि हवाई दलाच्या योजना त्यावर अवलंबून आहेत.

Exit mobile version