राजस्थानमध्ये हवाई दलाच्या विमानाला अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हवाई दलाचे मिग २९ विमान कोसळून मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात विमानाचा पायलट सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानमधील बारमेरमध्ये हवाई दलाचे मिग २९ विमान कोसळलं. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे हे लढाऊ विमान कोसळलं आणि विमानाला मोठा स्फोट होऊन आग लागली.
राजस्थानमधील बारमेरमध्ये रात्री सरावा दरम्यान हा अपघात झाला. लोकवस्ती नसलेल्या भागात हा अपघात झाला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जात आहे. बारमेरचे जिल्हाधिकारी निशांत जैन, एसपी नरेंद्र सिंह मीना आणि जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांनी घटनस्थळाला भेट दिली. तसेच या दुर्घटनेत वैमानिक सुखरूप बचावल्याचं हवाई दलानं एक निवेदन जारी करत सांगितलं आहे.
हे ही वाचा :
पश्चिम बंगाल: विशेष अधिवेशनात मांडणार विधेयक; बलात्काराच्या दोषींना १० दिवसांत फाशी
मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी
राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे
उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले
हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, “बारमेर सेक्टरमध्ये नियमित रात्रीच्या प्रशिक्षण मोहिमेदरम्यान, IAF मिग- २९ मध्ये तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे पायलटला विमानातून बाहेर पडावं लागलं. पायलट सुरक्षित असून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही, कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.”