भारतीय हवाई दलाने येत्या काही वर्षांत शक्तिशाली हवाई शक्तीचे रूपांतर विश्वासार्ह अंतराळातील शक्ती करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा भाग म्हणून ‘भारतीय हवाई आणि अंतराळ दल’ (आयएएसएफ) करण्यासाठी कंबर कसली आहे.
‘हवाई आणि अंतराळातील सातत्य’ आणि ‘अंतराळ दृष्टिकोन २०४७’च्या प्रभावी कार्यावर लक्ष केंद्रित करणारा एक नवीन सिद्धांत तयार केल्यानंतर भारतीय हवाई दलाने आता ‘आयएएसएफ’ असे नामकरण करण्याचे कारण सरकारला तपशीलवार स्पष्ट केले आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होईल अशी अपेक्षा असल्याचे हवाई दलाच्या एका सूत्राने सांगितले.
भारतीय हवाई दलाने स्वतःला केवळ गुप्तचर संस्थेची कामे, पाळत ठेवणे आणि टेहळणी तसेच, दळणवळणापुरते मर्यादित न ठेवता अंतराळाच्या अंतिम सीमारेषेचा पूर्णपणे फायदा घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
भारतीय हवाई दलाने आता अंतराळाशी संबंधित विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इस्रो, डीआरडीओ, इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर आणि खासगी उद्योगांशी सहकार्य करण्यास पुढाकार घेतला आहे. ‘पीएनटी (पोझिशनिंग, नेव्हिगेशन आणि टाइमिंग), प्रगत आयएसआर (गुप्तचर, पाळत आणि टेहळणी), संपर्क यंत्रणा, हवामान अंदाज, अंतराळ वाहतूक व्यवस्थापन आदीसारख्या क्षेत्रांत काम सुरू आहे.
हे ही वाचा:
साडेतीनशे कोटींचं घबाड सापडण्यापूर्वी काँग्रेस खासदार साहू काळ्या पैशाने होते व्यथित
महाराष्ट्रात ISIS विरोधात NIA ची कारवाई, साकीब नाचनला अटक
अमेरिकेत भारतवंशी जाणून घेणार राम मंदिराचा संघर्ष
भारतीय हवाई दल येत्या सात ते आठ वर्षांत खासगी क्षेत्राच्या मदतीने भारताकडे १०० हून अधिक मोठे आणि लहान लष्करी उपग्रह अंतराळात सोडण्याचा विचार करत आहे, तर सन २०१९ मध्ये स्थापन करण्यात आलेली ट्राय-सर्व्हिस डिफेन्स स्पेस एजन्सीही अवकाशात पूर्णपणे कार्यान्वित होईल.‘अधिकारी आणि हवाईदलाच्या प्रशिक्षणामध्ये अंतराळाचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये अंतराळाशी संबंधित आकस्मिक परिस्थितींसाठी लढण्याचे मार्गदर्शन केले जाईल. हवेपासून अंतराळात झेप घेणारी ही नैसर्गिक प्रगती आहे,’ असे या सूत्राने सांगितले.
भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनीही अलीकडच्या काही महिन्यांत भारताने मार्च २०१९मध्ये ‘मिशन शक्ती’च्या यशावर आधारित अंतराळ क्षेत्रात संरक्षणात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही क्षमता विकसित करण्याच्या गरजेवर जोर दिला आहे. आता पुढील युद्धे अंतराळात होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने भारतातही तयारी केली जात आहे. हवा आणि अंतराळात अखंडपणे काम करण्यासाठी प्रगत संस्था तयार केली जात आहेत. भारताला यासाठी तयार असणे आवश्यक आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.