भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. ठिकठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. देशभरात ऑक्सिजनची वाहतूक वेगाने होण्यासाठी आता भारतीय विमानदल मदतीला पुढे सरसावले आहे. जिथे गरज आहे तिथून ते ऑक्सिजन उत्पादन केंद्रांपर्यंत टँकर्सची वाहतूक वेगाने व्हावी यासाठी ही वाहतूक हवाई मार्गने केली जात आहे.
याचाच एक भाग म्हणून कालच सी-१७ आणि आयएल-७६ या विमानांनी काल तीन टँकर्सची वाहतूक केली. सी-२७ विमानाने दोन क्रायोजेनिक टँकर उचलले आणि आयएल-७६ विमानाने एक टँकर पनागढ येथून उचलला होता.
हे ही वाचा:
विरारचे जळीत कांड ही नॅशनल न्यूज नाही, आरोग्यमंत्र्यांचे निबर विधान
‘राजेश टोपे यांचे वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलता’
दिल्लीतही ऑक्सिजनअभावी २५ जण दगावले
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनिल माने यांना बेड्या
संपूर्ण देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्याने आता हा पर्याय वापरून पाहिला जात आहे.
गेल्या काही दिवसात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. भारतात गेल्या २४ तासात ३,३२,७३० नवे रुग्ण आढळून आले, जी जगातील विक्रमी रूग्णवाढ आहे. सलग दुसऱ्या दिवशी ३ लाखापेक्षा अधिक रुग्णवाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारतातील एकूण रुग्णसंख्या १,६२,६३,६९५ एवढी झाली आहे.
त्याबरोबरच भारताने लसीकरणाचा वेग वाढवायला देखील सुरूवात केली आहे. भारतात पूर्वी केवळ कोविशिल्ड आमि कोवॅक्सिन या दोनच लसींच्या आधारे लसीकरण केले जात होते. आत्तापर्यंत लसीकरणाची वयोमर्यादा ४५ होती. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट लस दिली जाणार आहे.