सूर्यकुमार यादव याच्या सांगण्यामुळेच ते राजकोट कसोटीत मुलाचे पदार्पण पाहण्यासाठी पोहोचू शकले, अशी कबुली सरफराजचे वडील नौशाद खान यांनी दिली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअममध्ये खेळला जात आहे. श्रेयस अय्यर जखमी झाल्याने सरफराज खान याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपला मुलगा देशासाठी खेळतोय, ही बाब कोणत्याही आईवडिलांसाठी समाधानाची बाब असते. मात्र सूर्यकुमार यादव नसला असता तर नौशाद खान आपल्या मुलाचे पदार्पण पाहू शकले नसते.
नौशाद खान हे राजकोटमध्ये तिसरा सामना पाहण्यासाठी येणार नव्हते. त्यांची तब्येत ठीक नव्हती. तसेच, सरफराज खान याचे पदार्पण या सामन्यात होईल, याचीही १०० टक्के खात्री नव्हती. मात्र सूर्यकुमार यादव यांनी त्यांना समजावले आणि नौशाद सामना बघण्यासाठी राजकोटला आले.
‘काल ११ वाजेपर्यंत येथे येण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. माझी तब्येत थोडी ठीक नव्हती. थोडा सर्दी-ताप आला होता. सूर्याने मला राजकोटला जाणार का असे विचारले. तेव्हा मी त्याला सगळी परिस्थिती सांगितली. तसेच, माझ्यामुळे त्याला सहज खेळ करता येणार नाही. तो दबावाखाली खेळ करेल. तो खेळेल, अशी आशा होती. मात्र १०० टक्के खात्री नव्हती,’ असे नौशाद खान म्हणाले.
हे ही वाचा:
‘हिंसेला माफी नाही, कोणतीही हिंसा अस्वीकारार्ह’
रोहित, जाडेजाच्या शतकांमुळे भारताची दमदार सुरुवात
हवामानाचा अचूक अंदाज मिळणार; इस्रोकडून अत्याधुनिक उपग्रहाचे प्रक्षेपण
‘तुमच्या आयुष्यात असा क्षण पुन्हा येणार नाही. मीही माझ्या आईवडिलांना घेऊन गेलो होतो, असे सूर्याने सांगितले. त्याने मला खूप चांगल्या प्रकारे समजावले. मग मीही त्याला प्रयत्न करतो, असे सांगितले. माझी पत्नीही सोबत असावी, असे मला वाटत होते. परंतु एकच तिकीट मिळाले आणि मी आलो,’ असे ते म्हणाले.