गुन्हेगारांना फाशी देताना त्यांचा चेहरा बघायचाय!

भाजपा आमदार सुरेश धस यांचे वक्तव्य

गुन्हेगारांना फाशी देताना त्यांचा चेहरा बघायचाय!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला आहे. या प्रकरणातील सगळे आरोपींना अजूनही अटक झाली नाही. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज (९ जानेवारी) पैठणमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. भाजपा आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलसह आदी नेते उपस्थित होते. यावेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर जोरदार हल्लाबोल केला. गुन्हेगारांना फाशी देताना त्यांचा चेहरा बघायचाय, असे सुरेश धस म्हणाले आहेत.

सुरेश धस म्हणाले, परळीतील इराणी समाजातील काही लोक आहेत, जे चरस, गांजा, देशी-विदेशी बंदुके यांची विक्री करतात. यांच्याकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती ही वाल्मिक कराड करत होता. या ठिकाणी पोलीस दलामधील लोक जर वाल्मिक कराड आणि त्याच्या ‘आका’चे ऐकून काम करत असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, टीव्ही चॅनेलवरील सीआयडी आणि सावधान इंडिया या कार्यक्रमामधील कलाकार पोलीस यांची नियुक्ती परळीला करावी.

हे ही वाचा : 

महाकुंभमेळ्यापूर्वी प्रयागराजमध्ये घनदाट जंगल तयार करणार

‘बंद करा ती आघाडी!’ ओमर अब्दुल्लांचा इंडी आघाडीवर तोफगोळा

उपरकोट जामा मशीद मंदिराच्या जागेवर बांधल्याचा दावा

सुकमा- बिजापूर सीमेवरील जंगलात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

वाल्मिक कराड २०२२ मध्ये ईडीची नोटीस आली होती. आकाने खूप माल जमा केल्यामुळे ही नोटीस आली असल्याचे सुरेश धस म्हणाले. यावेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराडांवर गैरव्यहाराचे आरोप करताना मालमत्तेचे तपशील दिले. परळीमध्ये एका वर्षात १०९ मृतदेह सापडले आहेत. यातील फक्त पाच रेकॉर्डवर आलेत. उर्वरित मृतदेहांची ओळखही पटली नाही आणि कशामुळे मृत्यू झाला याचीही काही माहिती नाही.

सुरेश धस पुढे म्हणाले, वाल्मिक कराड हा ३०२ चा आरोपी आहे. या मधल्या कालावधीत जर वाल्मिक कराड आणि त्याच्या वरचा आका यांच्या फोन झाला असेल तर त्या आकाच्या आकालाही तुरुंगात जावं लागेल. संतोष देशमुखला ठार मारलं, मारताना व्हिडीओ काढला. पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकलं. तुम्ही जितक्या बेकार पद्धतीने मारलं आहे तितक्याच बेकार पद्धतीने जल्लाद ज्यावेळी तुम्हाला फाशी देईल. त्यावेळेचा चेहरा आम्हाला बघायचा आहे, असे सुरेश धस म्हणाले.

Exit mobile version