मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोककल्याणाचे काम केले
ठाकरेंना दणका; शिवसेना शिंदेंचीचं, १६ आमदार पात्र!
अयोध्या, काशी,मथुरा नंतर आता राजस्थानच्या ८०० वर्ष जुन्या मशिदीवर प्रश्न!
कॉंग्रेस नेते राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत
आमदार अपात्रता या संदर्भात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निर्णय दिल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हे ट्विट केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही. मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल! मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.