‘मी इतक्या पुढचा विचार करत नाही’ भारताच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत गंभीर यांची भूमिका

‘मी इतक्या पुढचा विचार करत नाही’ भारताच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत गंभीर यांची भूमिका

भारतीय क्रिकेट संघाला येत्या काही दिवसांतच मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ टी २० विश्वचषक २०२४नंतर संपुष्टात येणार आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत गंभीर सर्वांत पुढे आहेत. गंभीर यांनी नुकतेच कोलकात्याचे मेंटॉर म्हणून संघाला आयपीएल विजेतेपद मिळवून दिले होते. त्यांना मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मी इतक्या पुढचा विचार करत नाही, असे स्पष्ट केले आहे.

गौतम गंभीर येथे इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात पोहोचले होते. गंभीर यांनी या आठवड्यात बीसीसीआयच्या क्रिकेड सल्लागार समितीला व्हर्च्युअल मुलाखत दिली. त्यांना भारताचे मुख्य प्रशिक्षकपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. गंभीर यांनी नुकतीच कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मेंटॉर म्हणून आयपीएल विजेतेपद मिळवण्यास मदत केली. जेव्हा त्यांना मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शक्यतेबाबत विचारण्यात आले तेव्हा ते काही बोलले नाहीत. ‘मी इतका पुढचा विचार करत नाही. तुम्ही मला खूप अवघड प्रश्न विचारत आहात,’ असे उत्तर त्यांनी दिले. ‘आता उत्तर देणे कठीण आहे. मी केवळ इतकेच सांगू शकतो की, मी आता खूष आहे. आत्ता एक शानदार प्रवास संपला आहे आणि त्याचा आनंद मी लुटतो आहे. मी आता खूप खूश आहे,’ असे तो म्हणाला.

हे ही वाचा:

नोकरांचे शोषण केल्याप्रकरणी हिंदुजा कुटुंबातील चार जणांना साडेचार वर्षांपर्यंतची शिक्षा

खालिस्तानी दहशतवादी निज्जरला संसदेत श्रद्धांजली देणाऱ्या कॅनडाला भारताने सुनावले

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशात पेपफुटी विरोधातील कायदा लागू

ओबीसी आरक्षणप्रश्नी अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक घेणार!

श्रीलंका दौरावर मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीर जाण्याची शक्यता

भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक डब्लूव्ही रमनही शर्यतीत आहेत. मात्र गंभीर हे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. याबाबतची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. येत्या काही दिवसांत याबाबतची घोषणा केली जाईल. गंभीर यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकासहित अन्य सपोर्ट स्टाफ निवडण्याची संधी मिळेल. गंभीर त्यांचा कार्यकाळ जुलैच्या मध्यापासून सुरू करण्याची शक्यता आहे. भारतीय संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करेल. त्यात तीन टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांसह तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश असेल.

Exit mobile version