उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये जबरदस्तीने धर्मांतर आणि छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन मुस्लीम भावांनी अल्पवयीन हिंदू मुलीवर रोजा पाळण्यासाठी आणि इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यापूर्वी वारंवार बलात्कार केला. बुरखा घालत नाही म्हटल्यावर तिचे केसही कापले. याबद्दल पीडितेने आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसात दिलेल्या तक्रारीत पीडितेने सांगितले की, कारवीच्या शेजारी असलेल्या तरुणा गावात ही घटना घडली. पीडितेने सांगितले की, सुरुवात २०२२ मध्ये झाली. तेव्हा ती दहावीमध्ये शिकत होती. अब्दुल रहमान, चौगलिया हा तिच्या मागे मागे नेहमी येत असे. त्याने तिच्यावर मैत्री करण्यासाठी दबाव टाकला होता. तिने त्याला अनेकवेळा नकार दिला मात्र त्याने तिला धमक्या दिल्या/
या धमक्यांना घाबरून भीतीपोटी या घटनेची माहिती तिने कुटुंबीयांना दिली नाही. यामुळे त्याचे मनोबल वाढले. आरोपीने तिला आपल्या राहत्या घरी बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अब्दुलने तिला ब्लॅकमेल करून अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. दरम्यान, अब्दुलचे दुसऱ्या महिलेशी लग्न झाले. यानंतर अब्दुलचा धाकटा भाऊ इरफान पीडितेचा पाठलाग करू लागला. त्याने पीडितेला तिचे भावासोबतचे संबंध माहीत असल्याचे सांगून ब्लॅकमेल केले. याचा फायदा घेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, आरोपीने पीडितेला घाबरवून सोडले आणि तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली.
आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. दरम्यान, ३० मार्च रोजी तो तिला पुण्याला घेऊन गेला. त्यानंतर तो तिला मशिदीत जाण्यास भाग पाडू लागला. इरफानने पीडितेला बुरखा घालण्यास सांगितले आणि तिने नकार दिल्यावर इरफानने तिचे केस कापले. अशी तक्रार पीडितेने केली आहे.