भाजपाच्या कार्यकर्त्यांपुढे नतमस्तक!

ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले श्रेय

भाजपाच्या कार्यकर्त्यांपुढे नतमस्तक!

मध्यप्रदेश लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारत भाजपने विजय मिळविला.भाजपला मिळालेल्या यशामुळे जनतेचे आणि भाजप कार्यकर्त्यांचे केंद्रीय मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी आभार मानले.मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी मराठीत प्रतिक्रिया देत म्हणाले, राज्यातल्या सर्व जनतेला मी सलाम करतो आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांसमोर मी नतमस्तक, असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

मध्यप्रदेशात भाजपने मुसंडी मारत विजय प्राप्त केला.त्यांनतर केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. भेटी दरम्यान ज्योतिरादित्य शिंदे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.मराठीत त्यांनी प्रतिक्रिया दिली. ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेतली आणि त्यांचे मी आभार मानतो. मध्य प्रदेशमध्ये भाजपचे यश हे पंतप्रधानांचे नेतृत्व आणि दुरदृष्टीवर जनतेने दाखवलेला विश्वास होय. त्याचसोबत अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्या धोरणांचा हा विजय आहे. मी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांसमोर नतमस्तक होतो आणि राज्यातील जनतेचे आभार मानतो.”

हे ही वाचा:

नेदरलँड्सचे ट्रम्प

घर-घर मोदी आता मन-मन मे मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे वक्तव्य!

निवडणूक निकालानंतर इंडी आघाडीची बैठक!

मध्यप्रदेशमध्ये लाडली योजनेचा प्रभाव

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे काम आणि त्यांची ‘लाडली बेहना’ ही योजना गेम चेंजर असल्याचं सांगितलं.ग्वाल्हेर आणि चंबळच्या जनतेने भाजपला साथ दिली. विरोधी नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर जनतेने विश्वास दाखवला नाही, त्यामुळे जनतेचे मी आभार मानतो, ते पुढे म्हणाले.

ज्योतिरादित्य शिंदे हे मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, मी भाजपचा एक साधा कार्यकर्ता आहे.भाजपचा कार्यकर्ता म्हणून पुढे देखील राहीन.मी भाजपसाठी नेहमीच काम करेन. असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

Exit mobile version