राजभवनात सध्याच्या कोलकाता पोलिसांच्या ताफ्यात मी सुरक्षित नाही!

बंगालचे राज्यपाल आनंदा बोस यांच्याकडून राज्य सरकार लक्ष्य

राजभवनात सध्याच्या कोलकाता पोलिसांच्या ताफ्यात मी सुरक्षित नाही!

राजभवनात सध्या तैनात असलेल्या कोलकाता पोलिसांच्या ताफ्यामुळे आपल्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा दावा पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांनी गुरुवारी केला आहे. राज्यपालांनी पोलिस कर्मचाऱ्यांना राजभवन परिसर रिकामा करण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे हे वक्तव्य आले आहे. मात्र राज्यपालांनी आदेश देऊनही हे पोलिस अद्यापही राजभवनात कार्यरत आहेत.

‘सध्याचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या पथकाच्या उपस्थितीमुळे माझ्या वैयक्तिक सुरक्षेला धोका आहे, असे मानण्याचे माझ्याकडे कारण आहे,’ असे बोस यांनी पीटीआयला सांगितले. ते म्हणाले, ‘मी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राजभवनात कोलकाता पोलिसांसमोर असुरक्षित असल्याची माहिती दिली आहे, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही,’ असा दावा त्यांनी केला. राजभवनात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून सतत पाळत ठेवली जात असून बाहेरच्या ‘प्रभावशाली’ व्यक्तींच्या सांगण्यावरून हे सुरू असल्याचे मी समजू शकतो, अशी तक्रार बोस यांनी राज्य सरकारकडे केल्याची माहिती राजभवनातील सूत्रांनी दिली.

हे ही वाचा..

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी!

सातवेळा खासदार राहिलेले भर्तृहरी महताब लोकसभेचे नवे हंगामी अध्यक्ष

जगभरातील सर्वांत उंच पुलावरून धावली रेल्वे!

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन

‘येथे तैनात असलेले पोलिस माझ्या हालचालींवर आणि माझ्या अधिकाऱ्यांवर पाळत ठेवून आहेत. सरकारमधील राजकीय गुरूंच्या पाठिंब्याने पोलिसांची ही कृती सुरू आहे. मात्र यातून राज्यघटनेतील संकेतांचे उल्लंघन होत आहे,’ असे बोस म्हणाले. राज्यपालांनी वेळोवेळी ही बाब बॅनर्जी यांच्या निदर्शनास आणून दिली, मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे गृहखातेही आहे.

‘गृहखात्याच्या अखत्यारित येणाऱ्या पोलिस खात्यातील सर्वोच्च अधिकाऱ्यांना माहीत असल्याशिवाय असे काहीही घडू शकत नाही,’ असेही त्यांनी ठामपणे सांगितले. सध्या प्रभारी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली राजभवनात तैनात असलेल्या पोलिस दलाच्या या ‘दुष्कृत्यां’बाबत त्यांना माहिती मिळाल्याचा दावाही बोस यांनी केला.

Exit mobile version