मध्य प्रदेश: हिंदू धर्माच्या प्रभावामुळे अन्वरने इस्लाम सोडून स्वीकारला सनातन धर्म!

महादेवगडचे संचालक अशोक पालीवाल यांनी केले शुद्धीकरण

मध्य प्रदेश: हिंदू धर्माच्या प्रभावामुळे अन्वरने इस्लाम सोडून स्वीकारला सनातन धर्म!

मध्य प्रदेशातील खांडवा येथील शेख अन्वर नावाच्या एका तरुणाने इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारला आहे. महादेवगडचे संचालक अशोक पालीवाल यांच्याकडे तरुणाने सनातन धर्मात परत येण्याची विनंती केली होती. यानंतर पंडितांच्या उपस्थितीत महादेवगड येथे तरुणाचे मुंडण आणि शुद्धीकरण केले गेले. गंगाजलाने स्नान घालून आणि वैदिक विधींचे पालन करून त्याला सनातन धर्मात समाविष्ट करण्यात आले. सनातन धर्मात परतल्यानंतर अन्वरचे राधेश्याममध्ये रुपांतर झाले.

अन्वरचे राधेश्याम झालेल्या तरुणाने म्हटले, हिंदू धर्माच्या प्रभावामुळे हा निर्णय घेतला. सनातन धर्माच्या प्राचीन परंपरा आणि भव्यतेमुळे आकर्षित झालो. तो पुढे म्हणाला, सनातन धर्मात कोणत्याही गोष्टीवर बंधन नाही. धार्मिक स्थळे आणि विधींमध्ये सर्वांना समान वागणूक दिली जाते. सनातन व्यवस्थेत देवांसोबत देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.

राधेश्याम पुढे म्हणाला, इस्लाममध्ये महिलांना जो दर्जा मिळत नाही तो सनातन धर्मात मिळतो. हिंदू धर्मात, दुर्गा माँ, काली, लक्ष्मी आणि सरस्वती यांसारख्या देवींसोबतच नद्यांनाही आईचा दर्जा देण्यात आला आहे.

राधेश्यामने असेही सांगितले की, त्याचे लग्न २३ वर्षांपूर्वी लक्ष्मी नावाच्या हिंदू मुलीशी झाले होते. इस्लाम धर्मात असूनही, त्याने एका हिंदू मुलीशी लग्न केले आणि कोणत्याही भांडणाशिवाय त्याचे वैवाहिक जीवन आनंदाने व्यतीत केले. पत्नीचे सनातन धर्माबद्दलचे प्रेम आणि आदर पाहून ते सनातनकडे आकर्षित झालो.

हे ही वाचा : 

… अन् मोहित्यांना दिसला मोत्यांमध्ये राम

मुर्शिदाबादमधील हिंसाचार, मृत्यूंच्या चौकशीसाठी हवे विशेष पथक

मुझफ्फरनगर: तरुणीचा हिजाब उतरवायला लावून सोबतच्या हिंदू तरुणाला मारहाण

दिल्लीत १५ परदेशी नागरिकांना अटक, बांगलादेशासह ‘या’ देशांच्या नागरिकांचा समावेश!

दरम्यान, खांडवाच्या महादेवगडचे संरक्षक अशोक पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत अर्धा डझन लोकांना इस्लाममधून सनातन धर्मात परत आणण्यात आले आहे. अशोक पालीवाल म्हणाले की, सनातन धर्मात सुरक्षितपणे परत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी महादेवगड नेहमीच तयार आहे.

मेहुल चोक्सीला द्यावा लागणार तीर्थ-प्रसादाचा हिशोब...काँग्रेसला नवा ताप| Dinesh Kanji | Mehul Choksi

Exit mobile version