श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, ‘भारताशी संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्ध’

पंतप्रधान मोदींचे मानले आभार

श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, ‘भारताशी संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्ध’

श्रीलंकेला काल (२२ सप्टेंबर) अनुरा कुमारा दिसानायके यांच्या रूपाने १० वे राष्ट्राध्यक्ष मिळाला. ५६ वर्षीय दिसानायकेने यांनी प्रतिस्पर्धी सजिथ प्रेमदासा यांचा पराभव केला. दरम्यान, अनुरा कुमारा दिसानायके यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्वीटकरत त्यांचे अभिनंदन केले. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष दिसानायके यांनीही पंतप्रधान मोदींचे आभार मानत ‘भारताशी संबंध दृढ करण्यासाठी मी वचनबद्ध’ असल्याचे म्हटले.

अनुरा कुमारा दिसानायके यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसानायके यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. भारताच्या नेबर फर्स्ट पॉलिसी आणि व्हिजन सागरमध्ये श्रीलंकेला विशेष स्थान आहे. आमच्या लोकांच्या आणि संपूर्ण प्रदेशाच्या फायद्यासाठी आमचे बहुआयामी सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दिसानायके यांनी पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाला उत्तर देताना त्यांचे आभार मानले. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही आमच्या लोकांच्या आणि संपूर्ण प्रदेशाच्या हितासाठी भारतासोबत सहकार्याने काम करण्यास तयार आहोत.

हे ही वाचा : 

‘लापता लेडीज’ चालला ऑस्कर वारीला!

‘दुर्गापूजा करायची असेल तर अल्लाहच्या नावाने ५ लाख द्या, नाहीतर कापले जाल’

पंजाबमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडल्या ‘लोखंडी सळ्या’

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर दिसानायके म्हणाले, शतकानुशतके पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. लाखो आशेने भरलेल्या डोळ्यांनी आपल्याला पुढे नेले असून आपण पुन्हा इतिहास लिहिण्यास सज्ज आहोत. त्यांनी या विजयाचे श्रेय सिंहली, तामिळ, मुस्लिम आणि सर्व श्रीलंकन ​​जनतेला दिले.

Exit mobile version