राज्यात ह्युंदाई कंपनी चार हजार कोटींची गुंतवणूक करणार

उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यात ह्युंदाई कंपनी चार हजार कोटींची गुंतवणूक करणार

राज्यात लवकरच मोठी गुंतवणूक होणार असून ह्युंदाई कंपनीचा चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राज्यात येणार आहे. यातील पहिला प्रकल्प पुण्यात उभारण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.

दक्षिण कोरियातील लोट्टे ग्रुप, एल. जी. इलेक्ट्रॉनिक्स कंपनीही राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असून त्यांचीही मोठी गुंतवणूक राज्यात होणार आहे.

दक्षिण कोरियामधील आइस्क्रीम बनविणारी आघाडीची कंपनी लोट्टे उद्योगसमूह पुण्यात ४७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या ‘हॅवमोअर ब्रँड’चे उत्पादन या प्रकल्पात होणार आहे. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात ह्युंदाईच्या व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा झाली असून पाण्याच्या फिल्टरमध्ये असलेल्या ॲल्युमिनिअम झाकणाचा प्रकल्पही राज्यात येणार आहे. त्यासाठी पाच एकर जागेची मागणी कंपनीने केली आहे, असे उदय सामंत म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील एल. जी कंपनीने राज्यात गुंतवणूक करावी यासाठी सरकार प्रयत्नशील असून कंपनीने पुण्यातील प्रकल्पाचा विस्तार करण्याचा मानस आल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनी जवळपास ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे जे उत्पादन कोरियात होते, तसे उत्पादन भारतात येऊन करण्याची विनंतीही करण्यात आली आहे, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

हे ही वाचा:

आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी

‘मणिपूर हिंसाचारावर लष्कर हा तोडगा नाही’

त्र्यंबकेश्वराचे व्हीआयपी दर्शन बंद!

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी रॅगिंग करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला अटक

राज्यात अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्यासाठी उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाचे शिष्टमंडळ दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात तेथील आघाडीच्या कंपन्यांशी सविस्तर चर्चा झाली असून, त्यांनी राज्यात गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे.

Exit mobile version