अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची आणखी एक घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यात बेपत्ता झालेला भारतीय विद्यार्थी मोहम्मद अब्दुल अराफत याचा मृतदेह सापडला आहे. मोहम्मद अब्दुल अराफात यांचा मृतदेह अमेरिकेतील क्लीव्हलँड येथून सापडला आहे. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे.
मोहम्मद अब्दुल अराफत हा नचाराम, हैदराबाद, भारताचा रहिवासी होता आणि तो गेल्या वर्षी मे महिन्यात क्लीव्हलँड विद्यापीठातून आयटीमध्ये मास्टर्स शिकण्यासाठी अमेरिकेत आला होता. अराफतचे वडील मोहम्मद सलीम यांनी सांगितले की, ‘७ मार्च रोजी अराफातशी शेवटचे बोलले होते, त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी कोणताही संपर्क नव्हता. त्याचा मोबाईलही बंद होता.
हे ही वाचा:
सौदी अरेबियाने काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेचे केले समर्थन!
‘सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मणिपूरची परिस्थिती सुधारली’
एलन मस्क यांनी टाकले मार्क झुकेरबर्गला मागे!
‘अनिल मसिह यांना विचारू, असे का केले?’
अराफतसोबत राहणाऱ्या तरुणाने अराफतच्या वडिलांना पोलिसांत हरवल्याची तक्रार केल्याचे सांगितले होते. १९ मार्च रोजी, अराफातच्या कुटुंबाला एक निनावी कॉल आला की अराफातचे ड्रग टोळीने अपहरण केले होते आणि त्याच्या सुटकेसाठी US$१,२०० ची मागणी केली होती. अराफतच्या वडिलांनी सांगितले की, ‘कॉल करणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली होती की, जर खंडणीचे पैसे दिले नाहीत तर तो अराफतची किडनी विकेल.’
मोहम्मद सलीमने सांगितले की, जेव्हा आम्ही कॉलरला पैसे कसे भरायचे विचारले तेव्हा त्याने याबद्दल माहिती दिली नाही. आम्ही आमच्या मुलाशी बोलण्याची मागणी केली असता त्यांनी नकार दिला. आता अराफत यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या आठवड्यातही भारतीय विद्यार्थिनी उमा सत्य साई गडदे हिचा ओहायो येथे मृत्यू झाला होता, त्याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मोहम्मद अराफत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. वाणिज्य दूतावासाने लिहिले की, ‘मोहम्मद अब्दुल अराफात, ज्याचा शोध घेतला जात होता, तो क्लीव्हलँड, ओहायो येथे मृतावस्थेत आढळून आल्याने अतिशय दुःख झाले आहे.मृत्यूची चौकशी करण्यासाठी स्थानिक एजन्सींच्या संपर्कात असल्याचे दूतावासाकडून सांगण्यात आले.