जबलपूरहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला रविवारी (१ सप्टेंबर) बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणास्तव हैदराबादला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात आप्तकालीन लँडींग करण्यात आले, इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र, विमानात कोणतीच संशयित वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, पोलीस आता धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. जबलपूरहून हैदराबादला जाणारे फ्लाइट ६E ७३०८ मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. त्यानंतर हैदराबादला जाणारे हे विमान नागपूरला वळवण्यात आले. नागपुरात सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून विमानाची तपासणी करण्यात आली.
हे ही वाचा :
उद्धव ठाकरेंना दोन वर्षांपूर्वीच जनतेने गेट आउट केलंय !
महाराजांनी सुरत लुटलीच नाही, पण कॉंग्रेसने तसं शिकवलं !
गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला करणारा अटकेत
गाझामधील बोगद्यात सहा ओलिसांचे मृतदेह सापडले
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बॉम्बची धमकी एका कागदाच्या तुकड्यावर मिळाली होती. हा कागद विमानाच्या बाथरुममध्ये मिळाला. त्यामुळे विमान नागपूरला उतरवून सुरक्षा एजन्सीने कठोर तपासणी केली. त्यात काहीच आक्षेपार्ह मिळाले नाही. त्यानंतर दुपारी दोन वाजता विमान हैदराबादकडे रवाना करण्यात आले. या प्रकरणी पोलीस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत.