बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील मोतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पतीने क्रूरतेची सीमा ओलांडत आपल्या पत्नीला मुलांपुढेच लाठ्यांनी मारहाण करत ठार केले. घटनेनंतर आरोपी पती फरार असून, त्याच्या अटकेसाठी पोलीस छापेमारी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीपूर परिसरातील झिंगहा गावातील रहिवासी मोहम्मद कलीमुल्लाह आलम याने आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर मेहरुन्निसाशी दुसरे लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होत होते. या काळात कलीमुल्लाह पत्नीवर वारंवार हात उचलत होता, ज्याचा गावकऱ्यांनी अनेक वेळा निषेधही केला होता.
संगितले जाते की, शुक्रवारी संध्याकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर पतीने घरात ठेवलेल्या लाठ्याने पत्नीवर मारहाण सुरू केली, ज्यात तिचा मृत्यू झाला. आरोपीने पत्नीचा मृत्यू होईपर्यंत आणि त्यानंतरही तिला मारणे सुरूच ठेवले. ही सगळी घटना त्यांच्या लहान मुलांपुढे घडली. मुले आपल्या आईला वाचवण्यासाठी ओरडत होती, पण कोणी मदतीला आले नाही. सांगितले जाते की, दोन दिवसांपूर्वीच पतीने पत्नीला माहेरहून परत आणले होते. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला आहे.
हेही वाचा..
शिरोमणी अकाली दलला मिळणार नवा अध्यक्ष
बीजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत काय घडले ?
देशभरात जय श्रीराम, जय हनुमानचा गजर!
वक्फ कायद्यावरून झालेल्या हिंसाचार प्रकरणी मुर्शिदाबादमध्ये ११० हून अधिक जणांना अटक
घटनेची माहिती मिळताच मोतीपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुजफ्फरपूर पश्चिम विभागाच्या पोलिस उपाधीक्षक सुचित्रा कुमारी यांनी सांगितले की, पहिल्या पत्नीच्या निधनानंतर कलीमुल्लाहने मेहरुन्निसाशी दुसरे लग्न केले होते. त्यांनी सांगितले की आरोपी सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून छापेमारी सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.