पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हिसार कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत जोडप्याच्या घटस्फोटाच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने हिसार कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली.
आपण स्वतः ५० टक्के अपंग असून पत्नीच्या त्रासामुळे २० किलो वजन कमी झाले आहे, असे त्याने सांगितले होते. पत्नीची वागणूक वाईट असल्याचे सांगून हिसार कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाला मान्यता दिली होती. मात्र पत्नीने या निर्णयाला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आवाहन केले होते.
जोडप्याचे २०१२ मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. पतीच्या म्हणण्यानुसार त्याची पत्नी एकदम तापट स्वभावाची असून तिने सासरच्यांशी कधीही जुळवून घेतले नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद उकरून काढायची तिला सवय होती, त्यामुळे त्याला त्याच्या घरच्यांसमोर मान खाली घालावी लागत असे. मात्र काही काळानंतर तिच्यात सुधारणा होईल असे मानून पतीने शांत राहणे पसंत केले होते. मात्र, तिच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. त्याचे वजन लग्नाच्या वेळी ७४ किलो होते, पण आता ते ५३ किलोवर आल्याचे पतीने न्यायालयाला सांगितले.
हे ही वाचा:
ही आहे ठाकरे सरकारची ‘ऐतिहासिक’ कामगिरी
खाजखुजली आणि बिस्कीट वापरणारे चोरटे गजाआड!
आता घरबसल्या काढता येणार बसचे तिकीट
प्रवाशांच्या नाराजीनंतर नवे मार्ग शोधण्याचाच ‘बेस्ट’ पर्याय
पतीची वागणूक नीट नसल्याचे पत्नीने याचिकेत म्हटले होते. आपण कधीही सासारच्यांशी वाईट वागलो नाही, असेही तिने म्हटले होते. सहा महिन्यानंतर पतीने आणि त्याच्या घरच्यांनी हुंड्यासाठी छळ केल्याचे महिलेने याचिकेत म्हटले होते. मात्र २०१६ मध्ये महिलेने आपल्या पतीला आणि मुलीला सोडून दिले होते. पतीच्या कुटुंबाने कधीही तिच्याकडे हुंड्याची मागणी केली नव्हती. सासरच्यांनी तिच्या उच्च शिक्षणासाठी खर्च केला असल्याचे उघड झाले. नंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हिसार कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत जोडप्याच्या घटस्पोटाच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.