माणुसकी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. संभाजीनगर येथे एका पादचाऱ्याला गाडीने उडविले पण त्याच्याकडे बघण्यासाठी कुणीही थांबले नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या त्याच्या बाजुने निघून गेल्या पण त्याच्या मदतीसाठी कुणीही धावले नाही. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून त्यावर संताप, हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा:
‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’
पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका
हा भीषण अपघात ४ डिसेंबर रोजी सकाळी ९.५५ वाजता औरंगाबादच्या रस्त्यावर घडला. एक तरुण मुलगा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अपघाताला बळी पडला. त्या तरुणाला एका ट्रकने धडक धडक दिली. ट्रकचा वेग जास्त असल्याने तो रस्त्यावर फेकला गेला आणि त्याचा मृत्यू झाला. कोणीही प्रवासी किंवा लोक त्याच्या मदतीसाठी आले नाहीत आणि त्याला मरण्यासाठी सोडले नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या दुर्घटनेचे दुःखद दृश्य कैद झाले असून ते आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. घटनेचा अधिक तपशील लवकरच उपलब्ध होईल अशी सूत्रांकडून माहिती.