26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषअवघ्या ५५ मिनिटांत लिव्हर आणि किडनी पोहोचले ५० किमीवर

अवघ्या ५५ मिनिटांत लिव्हर आणि किडनी पोहोचले ५० किमीवर

Google News Follow

Related

गुरुवारी कल्याणमधील एका खासगी रुग्णालयातून एका ब्रेनडेड अवयवदात्याचे यकृत आणि मूत्रपिंड हे परळ येथील एका खासगी रुग्णालयात दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपण करण्यासाठी घेऊन जायचे होते. कमीत कमी वेळेत हे अवयव सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचविणे हे एक आव्हान होते. मुंबईत अनेक वाहतूक पर्याय उपलब्ध असले तरी मुंबई परिसरात जलद आणि सुलभ प्रवासासाठी मुंबईच्या उपनगरी रेल्वेला पर्याय नाही.

कल्याणच्या फोर्टिस रुग्णालयातून एका ब्रेनडेड अवयवदात्याचे यकृत आणि मूत्रपिंड हे परळ च्या ग्लोबल रुग्णालयात पोहचवायचे होते. दोन्ही अवयव सुरक्षित आणि जलद रुग्णालयात पोहचवणे अपेक्षित होते. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि इतर समस्या लक्षात घेता मुंबईची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळख असलेल्या उपनगरी रेल्वेतून हे अवयव नेण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णालय आणि रेल्वे प्रशासनाने एकत्र येऊन ही मोहीम यशस्वी केली.

हे ही वाचा:

मायलेकराने जीव गमावण्यामागे होते हे खरे कारण…

‘शहापूर- खोपोली मार्गाचे काम राज्याकडे सोपवले ही मोठी चूक’

तिला व्हायचे आहे बॅडमिंटनपटू; पण पोट भरण्यासाठी चिरावी लागतेय भाजी

… म्हणून त्यांनी चोरल्या सव्वादहा लाखांच्या बाईक!

रेल्वे प्रशासनाने कल्याण ते परेल मार्गावर ‘ग्रीन कॉरिडोर’ बनवून ५० किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास ५५ मिनिटांमध्ये पूर्ण केला. परळ येथील रुग्णालयात दान केलेले अवयव सुरक्षित पोहचल्याने मुंबईची उपनगरीय रेल्वे पुन्हा एकदा ‘जीवनवाहिनी’ ठरली आहे.

कल्याण स्थानकातून दादर स्थानकापर्यंत हे अवयव आणण्यात आले. मानवी अवयव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करण्याच्या या पथकात डॉक्टर, रेल्वे संरक्षण दलाचे (आरपीएफ) जवान, कल्याण आणि दादर स्थानकाचे स्थानक व्यवस्थापक आणि काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यावेळी स्थानकावर उपस्थित रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांनी गर्दी हटवून प्रत्येक ठिकाणी वाट मोकळी करून दिली. २०१९ मध्येही रेल्वेने ठाण्यापासून दादरपर्यंत यकृत नेण्यास मदत केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा