संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी भारताचे मोठे पाऊल

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी भारताचे मोठे पाऊल

भारतीय स्मॉल आर्म्स फर्म एसएसएस डिफेन्सने (SSS Defence) इस्रायली फर्म फॅब डिफेन्सला, ज्याला झहल म्हणूनही ओळखले जाते, मागे टाकत हे कंत्राट मिळवले आहे. या कंत्राटांतर्गत भारतीय स्पेशल फोर्सेसच्या युनिटला मर्यादित संख्येने कॅलेश्निकोव्ह रायफल अपग्रेड करण्याचा करार करण्यात आला आहे. संरक्षण आणि सुरक्षा आस्थापनातील सूत्रांच्या हवाल्याने ‘द प्रिंट’ ने सांगितले की, बेंगळुरू स्थित एसएसएस डिफेन्स एका विशिष्ट युनिटच्या सेवेत २४ एके-४७ रायफल्स अपग्रेड करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये सर्वात कमी बोली लावणारे म्हणून उदयास आले आहेत.

“ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखादी भारतीय कंपनी, स्वतःचे स्वदेशी डिझाइन आणि उत्पादनांसह, भारतीय सैन्यासाठी रायफल अपग्रेड करेल,” एका सूत्राने सांगितले. आतापर्यंत, लष्कराच्या सेवेत असलेल्या एके-४७च्या अपग्रेडवर भारतीय बाजारपेठेत फॅब डिफेन्सची मक्तेदारी होती. लष्कराच्या विविध तुकड्या आधुनिक युद्धासाठी त्यांच्या कॅलेश्निकोव्हचे अपग्रेडेशन करत आहेत. फॅब डिफेन्सने गेल्या दशकात काही हजार रायफल्स अपग्रेड करण्यात यश मिळवले आहे.

आतापर्यंत, अपग्रेडसाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री आयात केली जात होती आणि एसएसएस डिफेन्सच्या करारामुळे स्वदेशी उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून अशा अधिक सौद्यांसाठी संधी उपलब्ध होऊ शकते.

अपग्रेडमध्ये रायफलसाठी नवीन फोल्डेबल बट स्टॉक, नवीन डस्ट कव्हर जे स्नायपर बसवण्यास जागा उपलब्ध करून देईल. एसएसएस डिफेन्सने कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय फ्लॅश हायडरसह रायफल अपग्रेड करण्याची ऑफर दिली आहे. सैन्याच्या विशिष्ट युनिटद्वारे जारी केलेल्या आवश्यकतांचा हा भाग नसला तरीही एसएसएस डिफेन्सने ही तयारी दर्शवली आहे.

हे ही वाचा:

राकेश टिकैत यांची पुन्हा एकदा सरकारला धमकी

निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाने हार पत्करली?

अखेर अनिल देशमुख ईडीसमोर हजर

जी-२० परिषदेत मोदींनी हवामान, शेती विषयाची केली यशस्वी मांडणी

विशेष म्हणजे, फॅब डिफेन्सच्या सर्व अपग्रेडमध्ये पॉलिमरचे बनलेले भाग समाविष्ट असताना, एसएसएस डिफेन्स एरोस्पेस मिश्रधातू ऑफर करत आहे. असेही सूत्रांनी सांगितले.

द प्रिंटने दिलेल्या बातमीनुसार, सशस्त्र दलांमध्ये सामान्यतः DSR म्हणून ओळखल्या जाणार्‍या दिग्गज ड्रॅगुनोव्ह स्निपर रायफलच्या अपग्रेडसाठी लष्कराकडून संभाव्य कराराकडे लक्ष देत आहे.

Exit mobile version