संजय उपाध्याय यांची रॅली ‘जनतेच्या साथीनं, विकासाच्या वाटेवर’

बोरिवलीत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

संजय उपाध्याय यांची रॅली ‘जनतेच्या साथीनं, विकासाच्या वाटेवर’

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांच्या रॅली आणि प्रचार सभांनी जोर धरला आहे. देशातला आणि राज्यातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने बोरिवली मतदारसंघातून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. संजय उपाध्याय यांची पक्षाचे विश्वासू नेते म्हणून ओळख आहे. तसेच भाजपा मुंबईचे ते सरचिटणीस आहेत. दरम्यान, बोरीवली मतदारसंघातून नाव घोषित होताच संजय उपाध्याय यांनी आपला मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. जागो-जागी भेट देवून जनतेच्या मनातील प्रश्न, अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय उपाध्याय यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात प्रचारसभेत सहभागी होताना दिसत आहे.

भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे सहभाग देखील संजय उपाध्याय यांच्या प्रचार सभेत दिसून आला. संजय उपाध्याय यांच्या रॅलीमध्ये कार्यकर्ते, नागरिकांची गर्दी पाहता संजय उपाध्याय हेच विजयी होणार अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.

बोरिवलीतील अशाच एका रॅलीमधील कार्यकर्ते, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहून भारावून गेल्याचे संजय उपाध्याय यांनी म्हटले. एक्सवर पोस्टकरत संजय उपाध्याय यांनी म्हटले, ‘जनतेच्या साथीनं, विकासाच्या वाटेवर’, माझ्या बोरिवली विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. १५ येथे माझ्या प्रचाराकरिता रॅली काढण्यात आली. या रॅलीला कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी माझ्यासह मा. माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे,  तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माता-भगिनींनी माझे औक्षण केले, माझ्या बोरिवलीवासियांचा हा प्रचंड प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो, असे संजय उपाध्याय यांनी म्हटले.

हे ही वाचा  : 

विक्रांत मॅसी हिंदुत्वाच्या बाजूने बोलला, मात्र हे चित्रपट प्रमोशनसाठी असल्याची टीका

युक्रेनमधील युद्ध वाढवू नका

संजीव खन्ना भारताचे ५१ वे सरन्यायाधीश

काँग्रेसकडून २८ बंडखोरांवर कारवाईचा बडगा

 

 

Exit mobile version