हबल दुर्बिणीने शोधला सूर्यमालेबाहेरील पाण्यासह एलियन ग्रह!

जीजे ९८२७डी असे ग्रहाला देण्यात आले नाव

हबल दुर्बिणीने शोधला सूर्यमालेबाहेरील पाण्यासह एलियन ग्रह!

पृथ्वीच्या पलीकडले जीवन आणि त्याचे अस्तित्व शोधण्याच्या शोधात, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाच्या खगोलशास्त्रज्ञांनी हबल स्पेस टेलिस्कोपचा वापर करून, त्याच्या वातावरणात पाण्याची वाफ असलेला सर्वात लहान ग्रह शोधला आहे. जीजे ९८२७डी असे नाव या ग्रहाला देण्यात आले असून त्याचा आकार पृथ्वीच्या व्यासाच्या दुप्पट आहे. त्यामुळे आपल्या आकाशगंगेतील पाण्याने समृद्ध वातावरण असलेल्या ग्रहांचे संभाव्य उदाहरण म्हणून याकडे पाहिले जात आहे.

नासाच्या म्हणण्यानुसार, नव्याने सापडलेल्या या ग्रहाचे तापमान शुक्राप्रमाणे ७५२ अंश फॅरेनहाइट (४०० अंश सेल्सिअस) पर्यंत पोहोचते. हा एक महत्त्वाचा शोध मानला जात आहे. या ग्रहावर अद्वितीय गुणधर्म आढळल्यामुळे हा शोध लक्षणीय मानला जात आहे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर एस्ट्रॉनॉमीच्या ऍटमोस्फेरिक फिजिक्स ऑफ एक्स्प्लोनेट्स विभागाच्या संचालक आणि या शोधपथकाच्या सदस्य लॉरा क्रेडबर्ग यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ‘जीजे ९८२७डी वरील पाण्याचा शोध विलक्षण आहे, कारण हा आतापर्यंतचा सर्वात लहान ग्रह आहे, जिथे आम्हाला वातावरण सापडले आहे,’ असे त्यांनी सांगितले. या ग्रहामुळे पृथ्वीसारखे जग दर्शविण्याच्या शोधाच्या आम्ही अधिक जवळ पोहोचलो आहोत, असे क्रेडबर्ग म्हणाले.

हे ही वाचा:

मोइज्जू यांना झाली जुन्या मैत्रीची आठवण, प्रजासत्ताक दिनाच्या भारताला दिल्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनी महिला शक्तीचे दिसले सामर्थ्य

प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झळकला ‘शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ’!

पद्म पुरस्कारांत अनोख्या कामगिरीची दखल पहिली महिला माहूत ते दिव्यांग कार्यकर्ता

जीजे९८२७ हा ग्रह पृथ्वीच्या सुमारे दुप्पट आकारमान असलेल्या जीजे ९८७ ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो. तो मीन नक्षत्रात अंदाजे ९७ प्रकाश-वर्षे दूर स्थित आहे. अंतराळ संस्थेच्या मते, हबल दुर्बिणीने तीन वर्षांच्या कालावधीत जीजे ९८२७ डीचे परिश्रमपूर्वक निरीक्षण केले. तथापि, नासाने म्हटले आहे की जीजे ९८२७ डीच्या वातावरणाबाबत हबलच्या निष्कर्षांचे तपशील सध्या अनिश्चित आहेत. दुर्बिणीने विस्तृत वातावरणात माफक प्रमाणात पाणी शोधले आहे की त्या ग्रहाची वातावरणीय रचना प्रामुख्याने पाणी आहे, याचा अभ्यास या शोधाचे नेतृत्व करणारे खगोलशास्त्रज्ञ आता करतील.

Exit mobile version