महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याबाबत माहिती समोर आली आहे. मंगळवार, २१ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांची निकालाची उत्सुकता संपली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंगळवार, दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
हे ही वाचा:
उपचारांसाठी भारतात आलेले बांगलादेशचे खासदार बेपत्ता
संसदेची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे!
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरांतून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डर जप्त!
मणिपूरमध्ये दोन तास चकमक; कुकी दहशतवाद्यांपासून ७५ महिलांची सुटका
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील आणि सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे digilocker app मध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.