‘या’ संकेतस्थळांवर बघता येईल बारावीचा निकाल

‘या’ संकेतस्थळांवर बघता येईल बारावीचा निकाल

‘राज्यातील बारावीचा निकाल केव्हा लागणार?’ हा प्रश्न गेले काही दिवस सतत कानावर पडत होता तो आता संपणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाची तारीख निश्चित झाली आहे. उद्या अर्थात मंगळवार ३ ऑगस्ट रोजी हा निकाल जाहीर केला जाणार आहे. ऑनलाईन जाहीर होणार हा निकाल दुपारी ४ वाजता लागणार आहे.

गेली अनेक महिने सुरु असलेल्या कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविद्यालये बंद होती. ऑनलाईन पद्धतीने मुलांची लेक्चर्स पार पडली असली तरीही कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारे यावर्षी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या वेटेजवर तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर बारावीचे गुण ठरवण्याचा फॉर्म्युला सरकारने काढला होता. त्याच निकषानुसार आता बारावीचा निकाल लावण्यात आला आहे.

हे ही वाचा:

१५ ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री भेटले नाहीत तर ‘मातोश्री’ समोर आत्मदहन

आरटीओतील ३६ टक्के पदे रिक्त राहण्यामागे हे आहे कारण…

पंतप्रधानांनी लॉन्च केलेले ई-रुपी आहे तरी काय?

पूजा चव्हाण प्रकरणात मिळाला मोठा पुरावा! संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?

उद्या चार वाजता जाहीर होणार हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन बघता येणार आहे. खालील दिलेल्या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

https://hscresult.11thadmission.org.in
https://msbshse.co.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in
www.mahresult.nic.in
https://msbshse.co.in

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्ष गायकवाडी यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंबंधीची घोषणा केली आहे.

Exit mobile version