आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी विशेष महत्त्वाचा ठरला. या महिन्यात त्यांनी देश-विदेशातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवस सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला आणि त्यांना तेथील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. गुजरातच्या नवसारी येथे त्यांनी “लखपती दीदी” कार्यक्रमात महिलांशी संवाद साधला. तसेच, त्यांनी गिर जंगलातील जैवविविधतेचा जवळून अभ्यास केला आणि वन्यजीव संरक्षणाच्या वंतारा प्रकल्पाची पाहणी केली.
३ मार्च (जागतिक वन्यजीव दिवस) : पंतप्रधान मोदी गिर नॅशनल पार्कला भेट दिली आणि तेथील नैसर्गिक सौंदर्य कॅमेऱ्यात टिपले. जंगलातील त्यांचे फिरण्याचे आणि बिबट्यांच्या जवळ काढलेल्या छायाचित्रांची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. रायसीना संवाद कार्यक्रमात, त्यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची भेट घेतली आणि दोघांनी गुरुद्वारा रकाबगंज साहिबला भेट दिली.
मॉरिशस दौऱ्यात, त्यांचे भव्य स्वागत झाले. त्यांनी गंगा तलावाला भेट दिली आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. रामगुलाम यांना गंगाजल भेट दिले, जे दोन्ही देशांमधील मैत्रीचे प्रतीक मानले गेले. ८ मार्च (आंतरराष्ट्रीय महिला दिन) : पीएम मोदी गुजरातच्या नवसारी येथे गेले, जिथे “लखपती दीदी” कार्यक्रमात महिलांनी त्यांचा सत्कार केला. त्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
हेही वाचा..
जोशींनी का सांगितले औरंगजेबचा मुद्दा अनावश्यक ?
मोदींच्या उत्तराधिकारी विषयावर काय म्हणाले फडणवीस ?
शशी थरूर यांच्याकडून मोदी सरकारवर स्तुतिसुमने; कोविड काळातील लस डिप्लोमसीचे केले कौतुक
विजय वडेट्टीवार म्हणतात, “आम्ही गुढी उभारायच्या भानगडीत पडत नाही”
वन्यजीव संवर्धन केंद्र वंतारा येथे, त्यांनी सिंह आणि इतर वन्यजीवांचा जवळून अभ्यास केला. त्यांच्या छायाचित्रांमध्ये सिंह शावकांना उचलतानाचे, लांडग्यासोबत खेळतानाचे आणि पांढऱ्या वाघाच्या डोळ्यांत डोळे घालून पाहतानाचे क्षण विशेष गाजले. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गबार्ड यांची भेट, त्यांना प्रयागराजच्या महाकुंभचे गंगाजल भेट दिले.
उत्तराखंडमधील हर्षिल येथे, त्यांनी बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये काही वेळ घालवला. नवरात्रि पहिल्या दिवशी, पंतप्रधान मोदी नागपुरातील आरएसएस मुख्यालयाला भेट दिली. त्यांनी डॉ. हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिली आणि संघप्रमुख मोहन भागवत यांच्यासोबत संवाद साधला. मार्च महिना पंतप्रधान मोदींसाठी अनेक महत्त्वाच्या दौऱ्यांनी आणि भेटींनी भरलेला राहिला.