इथे मिळेल ‘ई- पास’

इथे मिळेल ‘ई- पास’

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा कहर वाढत असल्याने सरकारतर्फे निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवासावर देखील निर्बंध लादण्यात आले आहेत. कोणत्याही प्रवासासाठी ई- पास सक्तीचा करण्यात आला आहे. हा ई-पास covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जर एखाद्या अपरिहार्य कारणासाठी, अत्यावश्यक सेवेसाठी किंवा आपात्कालिन परिस्थितीमध्ये प्रवास करायचा असल्याच ऑनलाईन ई- पास मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी  https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन, आवश्यक असलेली कागदपत्रे आणि प्रवासाचे कारण नमुद करावे लागेल. ज्यांना या संकेतस्थळाला भेट देणे शक्य नसेल असे लोक जवळच्या पोलिस ठाण्याच जाऊन ई- पास मिळवू शकतात.

हे ही वाचा:

कोविड-१९ वर औषध सापडल्याचा दावा

मोदी सरकारकडून देशातील गरीबांना मिळणार मोफत धान्य

ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा थेट जर्मनीहून

हवाई मार्गाने ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करण्यास केंद्राची परवानगी

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण भयावह वेगाने वाढत असल्याने सरकारने लोकांच्या प्रवासावर निर्बंध लादले आहेत. आता आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासावार विनाकारण प्रवासावर संपूर्ण निर्बंध लावण्यात आले आहेत. वैद्यकीय आपात्कालिन घटना, एखाद्याचा मृत्यु अशा अपरिहार्य कारणांमुळे प्रवासाला मुभा देण्यात आली आहे.

यापूर्वीच्या निर्बंधांत सरकारने ई-पासची व्यवस्था केली नव्हती. मात्र अनेकांकडून प्रवासासाठी ई- पास बाबत चौकशी केली गेली. त्यामुळे अगदी अपरिहार्य कारणात लोकांची प्रवासासाठी गैरसोय होऊ नये यासाठी गेल्यावर्षीच्या टाळेबंदीत ज्याप्रमाणे पास उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याप्रमाणे आत्ता देखील ती सोय पुन्हा एकदा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Exit mobile version