‘रॅट होल मायनरनी’ वाचवला ४१ कामगारांचा जीव!

अमेरिकन ऑगर मशीन फिकी पडल्यानंतर 'रॅट होल मायनरच्या' टीमने दाखवली जादू

‘रॅट होल मायनरनी’ वाचवला ४१ कामगारांचा जीव!

१२ नोव्हेंबरपासून सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी आणलेल्या बलाढ्य यंत्रानेही मान टाकली तेव्हा रॅट होल मायनर धावून आले. मानवी पद्धतीने खोदकाम करणाऱ्या सात जणांच्या या पथकाने ४८ तासांत १० मीटरपर्यंत बोगदा खणला आणि या बचाव मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा गाठला. रॅट होल मायनिंग म्हणजे मानवी पद्धतीने खोदकाम करण्यास मेघालयमध्ये सन २०१४मध्येच बंदी घालण्यात आली आहे.

बोगद्याच्या वरील आणि आडव्या भागाने छेद देऊन तीन ठिकाणी खणण्याच्या सहा योजना आखण्यात आल्या होत्या. यंत्राच्या साह्याने पाइपच्या आधारे अन्न आणि अन्य वस्तू अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचवण्यात यश आले. मात्र हे पाइप त्यांच्या बचावासाठी पुरे पडत नव्हते. मात्र कोळशाच्या खाणीत बोगदे खणण्यात कुशल असणाऱ्या या रॅट होल मायनरच्या सात जणांच्या पथकाने १० मीटरपर्यंत खणून या श्रमिकांच्या सुटकेत मोलाची भूमिका बजावली.
हे रॅट होल मायनर अरुंद आणि उभ्या असणाऱ्या खाणीतून कोळसा काढण्यातील तज्ज्ञ आहे. हे खाणकामगार अवघा तीन ते चार फूट खड्डा खणण्यात कुशल आहेत. त्यामुळे एक माणूस यातून सहज बाहेर पडू शकतो. या सर्वांना उत्तर प्रदेशमधील झांसी येथून बोलावले होते.

हे ही वाचा:

‘भारताने हमासला प्रतिबंधित संघटना म्हणून जाहीर करावे’!

सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पीएफ घोटाळा प्रकरणी गुन्हा

ठाकरे गटाचे उपनेते, माजी महापौर दत्ता दळवींना अटक; मुख्यमंत्र्यांवरचे आक्षेपार्ह विधान भोवले

१७ दिवसांनी त्या कामगारांनी पाहिला प्रकाश

२८ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत त्यांनी लहान साहित्याच्या आधारे १० मीटरपर्यंत खड्डा खणण्यात यश मिळवले. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ४१ श्रमिकांची बोगद्यातून यशस्वीपणे सुटका झाली.सन २०१२मध्ये एका खाणीत २० कोळसा श्रमिक अकडून १५ जणांचा जीव गेला होता. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने यावर तात्पुरती बंदी आणली. तर, सन २०१४मध्ये मानवी पद्धतीने खाणकाम करण्यास मेघालय सरकारने बंदी आणली.

Exit mobile version