जनमानसातील आत्मविश्वासाचा विकासच … विकसित भारत घडवेल

देशाचे पंतप्रधान हे सामान्य जनतेसोबत सेवक म्हणून कार्यरत आहेत

जनमानसातील आत्मविश्वासाचा विकासच … विकसित भारत घडवेल

 

संजय ढवळीकर

 

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, यांना जन्मदिवसाचे अभिष्टचिंतन !

त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि शांती आणि दीर्घायु लाभो. देशसेवा आणि समाजसेवेचे हाती घेतलेले महान कार्य पूर्णत्वास नेण्याची सामर्थ्य ईश्वर त्यांना देवो, हि प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना. पंतप्रधानांचा जन्मदिवस बहुतेक सर्व राजकीय, सामाजिक तसेच इतर स्थरातील सर्व मंडळी, हे वेगवेगळ्या प्रकारे विविध सेवा कार्याच्या माध्यमातून साजरा करतात. काही जण सेवा दिवस, सेवा सप्ताह, सेवा पंधरवडा, सेवा मास, साजरा करतात. त्याची प्रसिद्धी करतात.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे असे सर्व महत्वाचे दिवस, सण हे अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरे करत असतात. ते लोकाभिमुख असे कार्य अशा दिवसामध्ये , सणांच्या दिवशी करत असतात. त्याचप्रकारे ह्या जन्मदिवसाला त्यांनी तीन महत्वाचे प्रकल्प / योजना चा प्रारंभ केला, विश्वकर्मा योजना, आयुष्यमान भव योजना, आणि यशोभुमी प्रकल्प. खरं सांगता हे तिन्ही प्रकल्प / योजना , ह्या खुप महत्वकांक्षी आणि दीर्घकालीन परिणामकारक आहेत.

 

 

मा पंतप्रधान नरेंद्र मोदी जींच्या कार्यकाळात तसं बघता, अनेक महत्वाकांक्षी आणि दीर्घकालीन परिणामकारक संकल्प, प्रकल्प आणि योजना ची एक मोठी शृंखला २०१४ पासून सुरु झाली. त्यामुळेच भारत हा विकसित भारत या दृष्टीने मार्गक्रमण करू लागला. आणि लवकरच हा विकसित भारत , विश्वगुरू भारत म्हणून जगाला बोध देईल. गेल्या ९ वर्षांमध्ये भारतानी विविध क्षेत्रामध्ये अनेक महत्वाकांक्षी योजना यशस्वी पणे अमलात आणल्या. उदा. सामाजिक, संरक्षण, जागतिक संबंध, शेती, व्यापार, इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, हवामान आणि वातावरण, अर्थ इ. खरतर हि यादी अजून खुप मोठी, सर्वस्पर्शी आणि दूरगामी आहे. आणि ह्या सर्व क्षेत्रांवर काम करताना मा पंतप्रधानांनी नेहमीच १४० करोड जनतेचा, महिला कल्याणाचा, युवक विकासाचा, गरीब व्यक्तींचा, शेतकरी नि कष्टकरी जनतेचा, मजूर, तसेच तळागाळातील सर्व जनतेचा विचार आणि विकासच डोळ्यासमोर ठेवतात.

 

हे ही वाचा:

खर्गेचे G2 आणि गोयल म्हणाले 2G, One G, son G !

महाराष्ट्रात ‘शांतता’ आणि ‘सलोखा’ हाच त्या बैठकीचा अजेंडा…

उदयनिधी सावधान! द्रमुकच्याच खासदाराने दिला इशारा !

सरकार येईल जाईल पण हा देश टिकला पाहिजे !

मला नेहमी असे वाटते कि उत्तम कल्पना आणि त्यांचा यशस्वी कार्यान्वय ह्या मुळेच मा मोदीजी हे आज विकासपुरुष म्हणून जगभरामध्ये नावारूपास आले आहेत. आणि जगावर ठसा उमटवला आहे. ह्या व्यतिरिक्त अनेक अमलात आणलेल्या कल्पना आणि योजना मुळे भारत आज अग्रणी देश आणि विकसित देश होण्याच्या मार्गावर आहे. त्यातील काही अत्यंत परिणामकारक आणि महत्वाच्या क्षेत्रातील यशस्वी योजना आणि त्यांचा परिणाम:

१. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था हि आज जागतिक स्थरावर पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे, आणि लवकरच ती तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल. ह्याचा जागतिक स्थरावर खुप मोठा परिणाम झाला आहे आणि भारताला सर्व जग अत्यंत समर्थ राष्ट्र म्हणून बघू लागले आहे. त्यात सर्व विकसित देश पण येतात. आयात-निर्यात, विदेशी गंगाजळी, विदेशी चलन बाजारपेठ, व्यापार, तंत्रज्ञान विकास, इ. काही महत्वाच्या बाबींमध्ये मुल्याकंन केल्यास भारत हा खुप प्रगती पथावर आहे हे लक्षात येते. आणि ह्याची जग मोठ्या प्रमाणावर दखल घेत आहे. आज भारत हा जागतिक स्थरावर केंद्रस्थानी आला असून, अनेक जागतिक धोरणे हि भारतावर अवलंबून आहेत.

 

२. तंत्रज्ञान – भारत हा तंत्रज्ञानातील महासत्ता बनला आहे. सर्व जग त्याची दखल घेत आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीने भारताला जागतिक स्थरावर केंद्रस्थानी नेऊन ठेवले आहे. UPI प्रणाली अवलंबन, मोठ्या प्रमाणावर Unicorns ची उत्पत्ती, निर्मिती, अवकाश तंत्रज्ञान, चांद्रयान आणि सूर्ययान यांचं यशस्वी झेप, मोठ्या प्रमाणावर भारतात उभे राहिलेले fintech, insuretech, edutech, agritech, meditech इ platforms, ह्या सर्वामुळे भारत हे एक जागतिक स्थरावरील अभिनंदनीय आणि अनुकरणीय राष्ट्र बनले आहे.

 

३. मूलभूत सुविधा – अत्यंत वेगवान पद्धतीने आणि जागतिक उत्कृष्ठ दर्जाच्या मूलभूत सुविधांचा (विशेषतः दळण वळण साधने) विकास, ह्यामुळे भारतावर, सर्व जागतिक आणि भारतीय जनतेचा समुदायाचा विश्वास द्विगुणित झाला आहे.

 

४. व्यापार – भारत हा नेहमीच जगासाठी एक मोठी व्यापारी बाजारपेठ होता, आहे आणि राहील. परंतु सद्यस्थिती मध्ये भारत हा सर्वस्थरामध्ये एक अत्यंत मोठी जागतिक व्यापार आणि बाजारपेठ झाला आहे. विदेश व्यापार नीती, इज ऑफ डुईंग बिझनेस, पररराष्ट्रीय संबंध व व्यापार करार इ. मुळे भारत हा जगातील एक आकर्षक आणि विश्वसनीय देश झाला आहे.

 

५. रिसर्च आणि डेव्हलपमेंट – भारताने रिसर्च आणि डेव्हलपमेंट वर प्रचंड भर दिला आहे. बजेट मध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठ्या प्रमाणावर तरतूद आणि त्याअनुसंगाने खर्च ह्यामुळे, ह्याविषयामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. जागतिक स्थरावरील अनेक राष्ट्रे, भारताकडे ह्या विषयांमधील मार्गदर्शक म्हणून बघू लागली आहेत.

 

६. शेती – सेंद्रिय बियाणे, गोआधारित शेती, ह्यामुळे शेती आणि शेतकरी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे शेतमालाची निर्यात वाढली. शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये अर्थसहाय्य उपलब्ध झाल्याने, शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध झाला आणि त्याचा परिणामस्वरूप राष्ट्र समृद्धतेच्या कडे मार्गक्रमण करत आहे.

 

७. शिक्षण – आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्ञानाला विशेष महत्व दिले गेले आहे. ज्ञानाधिष्ठीत अर्थव्यवस्था आज मोठ्या प्रमाणावर रुजू झाली आहे. जागतिक स्थराच्या शिक्षण संस्था निर्माण झाल्याकारणाने आज विदेशात शिक्षण आणि नोकरी व्यवसाय निमित्त जाणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊन, युवकांची बुद्धिमत्ता देशासाठी कामी येण्याचे प्रमाण वाढले आहे.

 

वर दिलेले काही साध्यस्वरूप परिणाम आहेत. आपण हे परिणाम साध्य होण्यासाठीची कारणमीमांसा यावर थोडासा विचार केल्यास, माझ्या मनात आलेले आणि सुचलेले काही विचार:

१. विद्यार्थ्यांचा देशाप्रती आत्मविश्वास हा शैक्षणिक धोरण, शैक्षणिक संस्था निर्मिती आणि नवनवीन शैक्षणिक प्रणाली ह्यामुळे प्रचंड वाढला
२. शेतकऱ्यांचा देशाप्रती आत्मविश्वास हा शेतीविषयक धोरणातील सुधारणा ह्यामुळे प्रचंड वाढला
३. शास्त्रज्ञाचा देशाप्रती आत्मविश्वास हा त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि त्यांना दिलेल्या मानसिक पाठबळ ह्यामुळे प्रचंड वाढला
४. अर्थतज्ञांचा देशाप्रती आत्मविश्वास हा नवीन जागतिक दर्जाचे आर्थिक तंत्रज्ञान व पाठबळ ह्यामुळे प्रचंड वाढला
५. सैन्यदलाचा देशाप्रती आत्मविश्वास हा त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वास आणि त्यांना दिलेल्या स्वातंत्र्य ह्यामुळे प्रचंड वाढला
६. औद्योगिक आस्थापना आणि सूक्ष्म आणि मध्यम औद्योगिक संस्थाचा देशाप्रती आत्मविश्वास हा विविध प्रकारच्या सवलती आणि प्रक्रिया सुलभीकरण ह्यामुळे प्रचंड वाढला
७. वैद्यकीय व्यावसायिकांचा देशाप्रती आत्मविश्वास हा त्यांना दिलेल्या सहायता ह्यामुळे प्रचंड वाढला
८. खेळाडूंचा देशाप्रती आत्मविश्वास हा त्यांना मिळालेल्या जागतिक दर्जाच्या सोई सुविधा निर्मिती, प्रणाली आणि संधी ह्यामुळे प्रचंड वाढला
९. सेवा निवृत्त आणि जेष्ठ नागरीकांचा देशाप्रती आत्मविश्वास हा त्यांच्यासाठी राबवलेल्या विविध उपयुक्त योजना आणि त्यामुळे मिळालेले फायदे ह्यामुळे प्रचंड वाढला
१०. महिलांचा देशाप्रती आत्मविश्वास हा त्यांना मिळालेल्या समानता वागणूक आणि संधी ह्यामुळे प्रचंड वाढला
११. युवकांचा देशाप्रती आत्मविश्वास हा त्यांना मिळालेल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकीर्द आणि संधी ह्यामुळे प्रचंड वाढला

मला असे वाटते कि प्रत्येक नागरिक आणि संपूर्ण जनता हि देशाप्रती आणि देशातील नेतृत्वाप्रती आत्मविश्वासाने ओतप्रोत भरली आहे. जनतेचे वयक्तिक आणि सामाजिक अंग हे आत्मविस्वासाने भरून वाहत आहे. त्यांना कधीनव्हे एवढा देशावर अभिमान वाटतो आहे आणि प्रत्येक जण स्वतःला ह्या देशाचा एक महत्वपूर्ण निर्णायक घटक मानु लागला आहे. त्यांच्यामध्ये देशासाठी काही करण्याची उर्मी जागृत झाली आहे. आणि असा आत्मविश्वासाने ओतप्रत भरलेला समाज हा देशाच्या नेतृत्वाबरोबर कार्यपुर्तीसाठी तत्परतेने उभा आहे. प्रत्येकाला ह्या बदलत्या भारताचं स्वप्नपूर्तीमध्ये सहभागी व्हायचे आहे.

 

 

ह्या आत्मविश्वास वाढीचे महत्वाचे कारण म्हणजे, देशाचे पंतप्रधान हे सामान्य जनतेसोबत सेवक म्हणून कार्यरत आहेत. देशासाठी अपार कष्ट घेत आहेत. मग आपले सण हे देशसेवा करणाऱ्या जवानांच्या बरोबर साजरे करणे असो, मजूर, कामगारांचा सन्मान असो, खेळाडूंचा सन्मान असो, शास्त्रज्ञांचा गौरव असो, तळागाळातील अतिसामान्य व्यक्ती जे असामान्य कार्य कर्तृत्व करतात त्यांना पद्म पुरस्काराने गौरवणे असो, अशा अनेक उदाहरणातून ते समाजाचा एक घटक असल्याचा दाखल नेहमीच देतात.

 

 

भ्रष्टाचारमुक्त, दर्जेदार, उत्पादक, गुणवत्तापूर्ण, उच्च शिक्षित, सांस्कृतिक, प्रगतिशील भारत हि आज एक काल्पनिक रचना नसून वास्तविकता झाली आहे. आणि ह्यामुळे प्रत्येक नागरिकांमध्ये प्रचंड अशा स्वरूपाचे बदल घडून आले आहेत. आणि आज त्यांच्यात एकता, बंधुता, सद्भाव, देश प्रथम, आणि देशासाठी समर्पण अशा भावना जागृत झाल्या आहेत.

 

 

आपल्याला असे नक्की म्हणता येईल की, नक्की विकास कसला झाला, तर प्रत्येक व्यक्तीच्या आत्मविश्वाचा विकास झाला. राष्ट्रसेवेच्या भावनेचा विकास झाला, आपण देशाचे महत्वाचे घटक आहोत आणि देशासाठी खुप काही करू शकतो ह्या इच्छेचा विकास झाला, आणि अशा विकसित भावना निर्माण झालेल्या व्यक्तींच्या सामूहिक कार्यामुळेच आज भारत विकसित भारत ह्या पदावर मार्गस्थ झाला आहे.

 

 

जागतिक स्थरावर म्हणाल तर कोविड च्या काळामध्ये जगाने भारताचे त्यावेळेचे मार्गदर्शन, मदत आणि प्रभावीपणे हाताळलेली परिस्थिति पाहिली आणि अनुभवली आहे. भारतामुळे त्याकाळात जागतिक स्थरावर मानवजातीचे कल्याण झाले आहे. नुकतेच भारताच्या अध्यक्षतेखाली झालेले G20 शिखर संमेलन, ज्यामध्ये भारताने मानवजातीच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांती आणि समृद्धीसाठी केलेले संकल्प आणि कार्य, ह्यामुळे भारत आज एक जागतिक नेतृत्व म्हणून, जगासमोर उभा ठाकला आहे. ह्या दोन महत्वपूर्ण घटनांच्या अत्यंत यशस्वी हाताळणी मुळे भारत आज जागतिक दिशादर्शक नेतृत्व म्हणून मार्गस्थ झाला आहे. भारतीय नेतृत्वाला आज जागतिक मान्यता मिळाली आहे. जगाचा भारताप्रती आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

 

 

ह्या सर्वांचे श्रेय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल, सक्षम, नेतृत्वाला जाते. त्यांच्याच नेतृत्वात भारत आत्मनिर्भर झाला आणि विकसित भारत होऊ घातला आहे. त्यांनी प्रत्येक नागरिकांच्या मनाला भावणाऱ्या आणि आपलेपणा जपणाऱ्या “मन कि बात” या संवाद माध्यमातून निर्माण केलेल्या संधीमुळे, प्रत्येक नागरिकाला आपण ह्या समाजाचे घटक आहोत आणि आपण समाजाला काही देणे लागतो आणि ह्या समाजाच्या, देशाच्या, राष्ट्राच्या विकासाचे आम्ही भागीदार आहोत, हा भाव जागृत केला आहे. आणि हा जागृत झालेला भावच, प्रत्येक नागरिकांच्या सहकार्यातून आणि सहभागातून आणि एकतेच्या भावनेतूनच, मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, ह्या देशाला, राष्ट्राला, आणि भारताला विकसित भारत आणि विश्वगुरू भारत बनवण्याचे ध्येय साध्य करेल ह्यात काही शंका नाही.

 

(लेखक अखंड भारत व्यासपीठचे अध्यक्ष आहेत)

Exit mobile version