27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषचक्रीवादळ व्यवस्थापनात ओदिशा ठरलेय ‘रोल मॉडेल’

चक्रीवादळ व्यवस्थापनात ओदिशा ठरलेय ‘रोल मॉडेल’

नवीन पटनायक सरकारने वादळांपासून किंवा नैसर्गिक आपत्तीपासून कमीतकमी नुकसान व्हावे यासाठी दमदार पावले टाकली

Google News Follow

Related

बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातला धडक दिल्याच्या पार्श्वभूमीवर अशा चक्रीवादळांचा यशस्वीपणे सामना करण्याची कामगिरी ओदिशाने कशी काय केली, हे जाणे औत्सुक्याचे ठरेल. लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढणे आणि त्यांचा जीव वाचवणे हे ओदिशाचे आदर्श काम झाले आहे. सन १९९९च्या सुपर चक्रीवादळात झालेले एक हजार मृत्यू तर, २००१मधील चक्रीवादळात १० मृत्यू असा पल्ला ओदिशाने गाठला आहे.

२९ ऑक्टोबर १९९९ रोजीचा दिवस खोखन प्रामाणिक कधीच विसरू शकत नाहीत. ओदिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील त्यांच्या गावाला भरतीच्या प्रचंड लाटांनी तडाखा दिला. त्यात त्यांचे आई-वडील आणि भाऊ वाहून गेले. घरामागून एक घरे उद्ध्वस्त झाली. या दिवशी २६० किमी प्रति तास वेगाने सुपर चक्रीवादळ ओदिशात धडकले होते. यात जवळपास १० हजार जण मारले गेले. तेव्हा खोकन सात वर्षांचे होते. मात्र गेल्या दोन दशकांत बरेच काही बदलले आहे.

ओदिशाने १८९१पासून १००हून अधिक चक्रीवादळे पाहिली आहेत. देशातील कोणत्याही राज्याने पाहिलेली ही सर्वांत अधिक चक्रीवादळे आहेत. अशा प्रकारच्या चक्रीवादळामध्ये राज्याचा भूगोल महत्त्वाची भूमिका बजावतो. १९९९मध्ये भारताच्या हवामान खात्याकडे आजच्या सारखी मजबूत पायाभूत सुविधा नव्हती. २६ ऑक्टोबर रोजी, हवामान विभागाच्या हवामानशास्त्र महासंचालकांनी ओदिशाला (तेव्हाचे ओरिसा) भारताच्या पूर्व किनार्‍याकडे येणार्‍या चक्रीवादळाची माहिती दिली.

हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवर ४८ तासांनंतर धडकणार होते. ओदिशा सरकार त्या वेळी आपत्तीला तोंड देण्यास सक्षम नव्हते. सरकारने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यापुढे दोन प्रमुख आव्हाने होती – लोकांना त्यांचे जीवनावश्यक सामान सोडून देण्याची इच्छा नव्हती. तसेच, तेव्हा ओदिशात पुरेसे चक्रीवादळ निवारे नव्हते (राज्यात केवळ २१ निवारे होते. त्यात प्रत्येकी दोन हजार लोकांना लोकांना सामावून घेण्याची क्षमता होती). सुपर चक्रीवादळ २९ ऑक्टोबर १९९९ रोजी दुपारच्या सुमारास धडकले आणि राज्याची अपरिमित हानी झाली.

अधिकृत नोंदीनुसार, राज्यात सुमारे १० हजार जणांना जीव गमवावा लागला. साडेतीन लाखांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली, अनेक गावे पूर्णपणे वाहून गेली, दोन लाखांहून अधिक जनावरे मारली गेली आणि २५ लाख लोक बेघर झाले. चक्रीवादळाने मोठ्या संख्येने इमारतींना भुईसपाट केले, दळणवळण सुविधा विस्कळीत झाल्या आणि २४ तासांहून अधिक काळ ओदिशाचा उर्वरित जगापासून संपर्क तुटला. वीजपुरवठा खंडित झाल्याने आणि वीजवाहिन्या तुटल्याने संपूर्ण राज्य अंधारात गेले. विविध गावे आणि जिल्ह्यांतील संपर्क तुटला, रस्ते वाहून गेले. ओदिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरीधर गमंग यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

ओदिशाने पुढे काय केले?

सन २०००मध्ये ओदिशात बिजू जनता दल सत्तेवर आला आणि नवीन पटनाईक मुख्यमंत्री झाले. अवघ्या वर्षभरापूर्वी सुपर चक्रीवादळाचा तडाखा बसलेले राज्य अजूनही नुकसान सहन करत होते. राज्याच्या भौगोलिक स्थितीमुळे अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देता येत नाही, हे सरकारच्या लक्षात आले आणि त्यांनी हानी कमी करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य दिले.

१९९९च्या सुपर चक्रीवादळानंतर, ओदिशा सरकारने मजबूत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तयार करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. यामध्ये ओदिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केली. जिल्हा आणि ब्लॉक-स्तरीय आपत्ती व्यवस्थापन नियोजन समित्या, नैसर्गिक आपत्तींबद्दल सावधगिरी बाळगण्यासाठी इशारा देणारी प्रणाली आणि किनारी भागात राहणाऱ्या लोकांसाठी पक्की घरे बांधणे आदींची जबाबदारी या प्राधिकरणावर सोपवली. अशा प्रकारची ही भारतातील पहिली संस्था ठरली.

एप्रिल २०१८मध्ये ओदिशाने आपल्या ४८० लांब किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना चक्रीवादळ आणि त्सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींबद्दल सावध करण्यासाठी पूर्व इशारा प्रसार प्रणाली (EWDS) स्थापित केली. मोठी आपत्ती टाळण्यासाठी ओदिशाने उच्च प्रशिक्षित आणि ओदिशा आपत्ती रॅपिड अॅक्शन फोर्स (ओडीआरएएफ) च्या 20 पेक्षा जास्त तुकड्या उभारल्या आहेत.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना ५० हजार फुटांवरून टिपणार

आशिया कपमध्ये बुमराह, श्रेयस अय्यर खेळण्याची शक्यता

मणिपूरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला

गुजरातला ‘बिपरजॉय’चा तडाखा! वादळाने घेतला पिता-पुत्रांचा प्राण

परिणाम काय झाला?

ओदिशा मोठ्या आर्थिक नुकसानीतून सुटू शकला नसला तरी नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी मानवी जीवितहानी कमी करण्यात सरकारला यश मिळाले. ओदिशातील मागील पाच चक्रीवादळांमधील मृतांच्या संख्येवर एक नजर: चक्रीवादळ यास (२०२१): १० चक्रीवादळ अम्फान (२०२०): ३ चक्रीवादळ फानी (२०१९):६४ चक्रीवादळ तितली (२०१८) ) ७७ चक्रीवादळ फायलिन (२०१३): ४४ सन २०१३ मधील चक्रीवादळ फायलिन धडकले त्यावेळी राज्याच्या व्यवस्थापनाचे संयुक्त राष्ट्रांनी कौतुक केले. राज्याची ही यंत्रणा आता इतरांसाठी एक आदर्श ठरली आहे. ऑक्टोबर १९९९मध्ये, सात वर्षांचा खोकन त्याच्या आजीसह वटवृक्षावर चढला. त्यानंतर समुद्राच्या चक्रीवादळामुळे वाहून गेलेल्या त्याच्या वडिलांनी त्याला झाडावर चढण्यास मदत केली होती. खोकनने त्याचे जवळजवळ संपूर्ण कुटुंब गमावले. त्यानंतरही ओदिशाने अनेक चक्रीवादळे पाहिली आहेत, परंतु खोकनच्या नशिबी जे दु:ख आले, ते आता लोकांच्या वाट्याला येत नाही.

ओदिशाचा आदर्श घेऊन भारताने सन २००५मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केली. देशातील आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांचे धोरण, नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीचे कार्य ही संस्था करते. चक्रीवादळाचा इशारा आधीच देण्यासाठी भारताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. भारताने आपत्ती व्यवस्थापनात तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण सुविधा कार्यान्वित केल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा