नवी दिल्ली येथे पुढील महिन्यात होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या आयोजनाची तयारी सुरु झाली आहे.मात्र, नवी दिल्ली नगरपरिषद (NDMC) समोर एक विचित्र आव्हान निर्माण झाले आहे. G20 शिखर परिषदेसाठी परिसरात वनस्पतींच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.या परिसरात माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने कुंडीतील वनस्पतींचे संरक्षण आणि G20 ताफ्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून नवी दिल्ली नगरपरिषद उपाययोजना करत आहेत.नैसर्गिक अधिवासात वसलेल्या या माकडांचे स्थलांतर करणे अशक्य असल्याने NDMC ने वनविभागाच्या सहकार्याने लंगूरचे कटआउट्स काढून जागोजागी लावण्यात आल्याचे दिसून आले आहे.
स्थिरपणे लावण्यात आलेल्या लंगूरचे कटआउट्स कालांतराने पडतील याची चिंता देखील अधिकाऱ्यांना आहे.त्यामुळे या माकडांचा मुकाबला करण्यासाठी कटआउट्स वेळोवेळी हलवण्यात येतील अशी योजना देखील त्यांनी केली आहे.वन विभागाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, सरदार पटेल मार्गावरील मध्यवर्ती रिजच्या सीमा भिंतीवर लंगूरचे कटआउट्स लावण्यात आले आहेत. हे कटआउट्स नियमितपणे वेळोवेळी हलवण्याचे काम करू, जेणेकरून माकडांना खरे लंगूर आसपास आहेत असे त्यांना वाटेल.
हे ही वाचा:
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या कंपनीविरोधातील केसचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयकडून सादर
ब्रिक्स परिषदेदरम्यान नेते मोदींच्या शेजारी बसू पाहात होते!
रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेचे महत्त्व
आव्हाडांनी तेलगी प्रकरणातील अदृश्य हात उघड केला; नंतर पोस्ट डीलीट केली
या धोरणाची माहिती देताना एनडीएमसीचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय म्हणाले,हा एक प्रकारचा प्रयोग आहे जो आम्ही करत आहोत.यशस्वी झाल्यास, आम्ही असे कटआउट अधिक ठिकाणी लावू. आम्हाला आशा आहे की, या प्रयोगामुळे रस्त्याच्या कडेला नवीन लागवड केलेल्या रोपांचे संरक्षण होईल तसेच सभोवतालच्या हिरव्यागार जागेचे या प्राण्यांपासून नुकसान होणार नाही.ही माकडे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहतात आणि आम्ही त्यांना नियमांविरुद्ध कुठेही हलवू शकत नाही, असे एनडीएमसीचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय म्हणाले.