31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषदेशभरातील उत्पादक जगभरातील नेत्यांना सांगणार ‘मिलेट्स’ची यशोगाथा

देशभरातील उत्पादक जगभरातील नेत्यांना सांगणार ‘मिलेट्स’ची यशोगाथा

जी-२० परिषदेत येणाऱ्या देशविदेशातील पाहुण्यांना सांगणार महत्त्व

Google News Follow

Related

ओदिशाच्या मयूरभंजमधील ‘मांडिया दीदी’ (मिलेट दीदी) या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुबासा मोहंता यांना भारतात पहिल्यांदाच होणाऱ्या जी २- शिखर परिषदेत जागतिक नेत्यांसमोर मिलेट्स (ज्वारी, बाजरी) लागवडीचे त्यांचे मनोगत आणि अनुभवांचे सादरीकरण करण्याचा मान मिळणार आहे. ओदिशातीलच रायमाती घिउरिया या महिलादेखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यांनी त्यांच्या कोरापुट गावातील महिलांना ‘मिलेट्स’ची लागवड करण्यासाठी कसे प्रोत्साहित केले आणि आता ३५ कुटुंबे कशाप्रकारे ‘मिलेट्स’चे पीक घेत आहेत, याची कथा ते सांगतील.

 

“पूर्वी, आम्हाला ज्वारी, बाजरीच्या विक्रीतून फारच कमी महसूल मिळत असे. मुख्यतः आम्ही जे धान्य पिकवत असू, ते स्वतःच्या वापरासाठी होते. मात्र आता या धान्यांना बाजारात चांगला भाव मिळत आहे. आम्ही वापरतो त्या सर्व पारंपारिक वस्तू आम्ही कार्यक्रमात प्रदर्शित करण्यासाठी आणल्या आहेत,” असे या महिला सांगत आहेत. या दोन्ही महिला आदिवासी समुदायाचे प्रतिनिधीत्व करतात.

 

ओदिशा सरकारने ‘मिलेट मिशन’ सुरू केल्यानंतर परिस्थिती नाट्यपूर्णरीतीने बदलली. आता ओदिसामधील ३०जिल्ह्यांतील १७७ ब्लॉक्समध्ये ज्वारी, बाजरीचे पीक घेतले जाते. ‘मिलेट्स’चे अनेक प्रकार असून ते मानवी शरीरासाठी पोषक आहेत.
मोहंता या सन २०१८पासून ‘मिलेट्स’ची लागवड करतात. मोहंता यांना त्यांच्या पुतण्याने सर्वांत प्रथम २५० ग्रॅम ‘मिलेट्स’चे बियाणे दिले होते. तेव्हा या धान्याशी त्यांची ओळख झाली. ‘मी काकडी, भोपळे आणि इतर भाज्या पिकवायचे. मात्र मला कधीही चांगला परतावा मिळाला नाही. परंतु या धान्यांची लागवड केल्यापासून माझी आर्थिक स्थिती सुधारली आहे,’ असे त्या सांगतात. सध्या त्या जवळपास चार एकरांवर ज्वारी, बाजरी आदी ‘मिलेट्स’ची लागवड करतात.

 

हे ही वाचा:

दहीहंडीत १९५ गोविंदा जखमी, मात्र अनर्थ टळला

आयआयटीचे संचालक म्हणतात मांसाहारामुळे हिमाचलमध्ये ढगफुटी

स्तूपांचे शहर सांची होणार भारतातील पहिले ‘सौर शहर’

चीनचा ड्रॅगन खाली घसरतोय!

कमाल आधारभूत किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या धान्यांना चांगला भाव मिळत आहे. जमीन मालकांना वार्षिक करारापोटी ठराविक रक्कम देऊनही त्या नफा मिळवत आहेत. मार्चमध्ये मोहंता यांनी ‘मिलेट्स’वरील जागतिक परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींशी संवाद साधला होता आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली होती.
‘मिलेट्स’च्या लागवडीने घिउरिया या महिलेचे केवळ आयुष्यच बदलले नाही तर त्यांनी स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांकडून ‘मिलेट्स’ खरेदी करणारी ‘शेतकरी उत्पादन’ कंपनी स्थापन करण्याचे नेतृत्व केले. त्या त्यांच्या गावात ‘मिलेट्स टिफिन सेंटर’ चालवण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्थांना मदत करतात. ‘आता आम्ही आमचे धान्य कमाल आधारभूत किमतीमध्ये मंडईत विकतो,’ असे त्या सांगतात.

 

केंद्र सरकारतर्फे ‘मिलेट्स’ला लोकप्रियता मिळवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जात आहेत, हे जगभरातील नेत्यांना दाखवण्यासाठी देशातील विविध भागांतून सुमारे दोन डझन उच्च कामगिरी करणाऱ्या उत्पदकांना नवी दिल्लीत बोलावण्यात आले. ‘आमची ७५० शेतकऱ्यांची संघटना आहे आणि त्यापैकी जवळपास २५० महिला आहेत. आम्ही ‘मिलेट्स’बद्दल अधिक जागरूकता निर्माण करत आहोत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उत्पादनांची गुणवत्ता वाढवत आहोत,’ असे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील क्षिता एम लाडवंती यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा