छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी बुधवारी (२६ मार्च) सांगितले की, गेल्या दीड महिन्यात राज्यात ३२५ हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत आणि २००० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे किंवा त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. मुख्यमंत्री साई यांनी दावा केला की, “संपूर्ण छत्तीसगड नक्षलवादाने ग्रस्त आहे अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे, जी खरी नाही. छत्तीसगडचा एक छोटासा भाग, जो बस्तर आहे, तो नक्षलवादाच्या समस्येने ग्रस्त आहे आणि उर्वरित राज्य या समस्येपासून मुक्त आहे.”
ते पुढे म्हणाले, आमचे एक वर्ष जुने सरकार आणि आमचे सुरक्षा दल नक्षलवादाच्या समस्येविरुद्ध शौर्याने लढत आहेत आणि केवळ दीड महिन्यात ३२५ हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत आणि २००० हून अधिक नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे किंवा त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवाद्यांचा लवकरच खाता करण्यात येईल, असा विशास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
बलुचिस्तानमधील संघर्ष, परराष्ट्र धोरणावरून इम्रान खान यांनी पाक सरकारला सुनावले
पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याच्या घरावर बॉम्बहल्ला आणि गोळीबार!
नाशिकमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचे १८१ ‘बांगलादेशी’ लाभार्थी; एफआयआर दाखल
अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वाहनांवर २५ टक्के कर; कोणत्या भारतीय कंपन्यांवर होणार परिणाम?
राज्याने आत्मसमर्पण करणाऱ्यांसाठी अनुकूल पुनर्वसन पॅकेज तयार केले आहे. याशिवाय नक्षलग्रस्त भागात ‘आपका सुंदर गाव’ नावाची योजना देखील सुरू करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत तेथे सुमारे ३८ सुरक्षा छावण्या उघडण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ १०० हून अधिक गावांना दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याचा संकल्प केला असल्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी सांगितले.