30 C
Mumbai
Thursday, April 10, 2025
घरविशेषमुंबईत कसा सुरू आहे ‘हाऊसिंग जिहाद’?

मुंबईत कसा सुरू आहे ‘हाऊसिंग जिहाद’?

हिंदू रहिवाशांना अल्पमतात करून मुस्लिमांना बहुमतात करण्याचा कुटील डाव

Google News Follow

Related

मुंबईत सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये ‘हाउसिंग जिहाद’चा प्रकार सुरू असून हिंदू रहिवाशांना अल्पमतात करून मुस्लिमांना बहुमतात करण्याचा कुटील डाव मुस्लिम विकासकांनी सुरु केल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला होता.

काय आहे ‘हाउसिंग जिहाद’?

लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, व्होट जिहाद असे जिहादचे अनेक प्रकार समोर येत असताना आता मुंबईत ‘हाउसिंग जिहाद’ हा नवा प्रकार समोर आला आहे. ‘हाउसिंग जिहाद’च्या माध्यमातून हिंदू बहुसंख्य असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांमधून मुस्लिमांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींचा देखील समावेश आहे. यामुळे हिंदू बहुसंख्य असलेल्या गृहनिर्माण संस्थांमधून हिंदू रहिवासी अल्पसंख्याक होत असल्याचे दिसून येत आहे आणि मुस्लीम रहिवाशांची संख्या मात्र वाढत आहे.

‘हाउसिंग जिहाद’ हा मुस्लीम बांधकाम व्यावसायिकांकडून पुरस्कृत करण्यात येत असून काही प्रकल्पांमध्ये, मुस्लिम बांधकाम व्यावसायिक बनावट नोंदी तयार करून एका कुटुंबाला एकापेक्षा जास्त घरे देत आहेत. वीज बिलांमध्ये फेरफार करून अपात्र लोकांना पात्र दाखवले जात आहे. यात अब्दुल सुभान किताबुल्ला याच्या नावे १७ घरे, अब्दुल गनी किताबुल्ला याच्या नावे १३ घरे, जनून इकबाल घासवाला याच्या नावे १९ घरे, सरीम सिकंदर घासवाला, अतीकुर रेहमान घासवाला अशी अनेक नावे समोर येत आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) नियमानुसार एका व्यक्तीला एकच घर मिळू शकते. उदाहरणार्थ, २०२१ मध्ये ओशिवरा येथील एका परिसरात ४५ झोपड्या पुनर्वसनासाठी पात्र होत्या, परंतु २०२२ मध्ये हा आकडा ८२ वर गेला आणि २०२३ मध्ये ९५ वर पोहोचला. संजय निरुपम यांच्या मते, हे वाढलेले आकडे म्हणजे बनावट नोंदींचे परिणाम आहेत. संजय निरुपम यांनी मुंबईत होणाऱ्या ‘हाउसिंग जिहाद’ मधील घटना समोर आणल्या आहेत. श्री शंकर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (शास्त्री नगर) आणि ओशिवरा पॅराडाईस 1 आणि 2 (जोगेश्वरी पश्चिम) यांसारख्या प्रकल्पांची नावे समोर येत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी आणि काही बांधकाम व्यावसायिक मिळून बेकायदेशीररित्या पात्रता ठरवून मुस्लिम लोकसंख्या वाढवण्याचे काम करत आहेत. या हाउसिंग जिहादच्या घटना मुख्यतः पश्चिम उपनगरांसह गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, साकीनाका आणि बांद्रा या भागात घडत आहेत. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या ६०० प्रकल्पांपैकी सुमारे १० टक्के प्रकल्प हे मुस्लीम बांधकाम व्यावसायिक चालवत आहेत.

हे ही वाचा : 

उबाठाच्या संजय राऊतांविरोधात शिवसेना महिला आघाडीने उगारले ‘जोडे’

महाकुंभमध्ये आलेल्या ६६ कोटी भाविकांची गणना कशी केली?

बांगलादेश: हिंदूंच्या घराची तोडफोड, अतिथंडीमुळे महिलेचा मृत्यू!

महाकुंभाची समाप्ती, मुख्यमंत्री प्रयागराजमध्ये दाखल, गंगा पूजेत सहभागी!

मुंबईमध्ये मुस्लीम वस्ती वाढवण्यासाठी काही विकासक एसआरए प्रकल्पांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. पुनर्विकास करताना तेथील मूळ हिंदू रहिवाशांना अल्पमतात दाखवून मुस्लीम रहिवाशांचे बहुमत निर्माण करण्याचा डाव आहे, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. मुस्लिम विकासक झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रकल्प हातात घेतात आणि एसआरए अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीररित्या मुस्लिम लोकांच्या नावाने झोपड्या पात्र करुन घेतात. काही प्रकल्पांमध्ये मुस्लीम रहिवासी तुरळक आणि हिंदू रहिवाशांचे बहुमत असतानाही तेथे बेकायदेशीररित्या मुस्लीम नाव पात्र करुन घेण्यात आली आहेत. हिंदूना अल्पमतात ठेवत असल्याचे प्रकार मुंबईत सुरु आहेत, असा दावा संजय निरुमप यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा