27 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषशेवटच्या काही तासांमध्ये मतदानाचा टक्का कसा वाढला? निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

शेवटच्या काही तासांमध्ये मतदानाचा टक्का कसा वाढला? निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीला यश मिळाले तर महाविकास आघाडीच्या पदरी अपयश आले. यानंतर या निकालावर आणि एकूणच मतदान प्रक्रियेवर महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून टीका केली जात आहे. शेवटच्या काही तासांमध्ये अचानक मतदानाचा टक्का कसा वाढला यावर महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर रात्री ११.३० वाजेपर्यंत ६५.२ टक्के मतदान कसे झाले? असा प्रश्न विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहेत. शिवाय टीकाही केली जात आहे. यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. शेवटच्या टप्प्यात असा मतदानाचा टक्का वाढणे हे अतिशय सामान्य बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एस. चोक्कलिंगम म्हणाले की, “सायंकाळी शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढणे हे सामान्य आहे. निमशहरी आणि शहरी भागात शेवटच्या काही तासात मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे हा मतदानाचा टक्का वाढतो. सायंकाळी सहा वाजण्याची आधी जो मतदार रांगेत येऊन उभा राहतो, त्याचे मतदान संपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरूच राहते. ही रांग संपण्यासाठी कधी कधी सहा वाजण्याची मर्यादाही पुढे जाते. २०१९ साली सायंकाळी ५ वाजता जवळपास ५४.४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर अंतिम मतदानाची आकडेवारी ६१.१ टक्के झाली होती,” असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची माहिती ही टेलिफोनवरून तोंडी दिली जाते. मतदान संपल्यानंतर मात्र मतदानकेंद्रावरील अधिकारी फॉर्म १७- सी भरून देतात, ज्यामध्ये अंतिम आकडेवारी नमूद केलेली असते.

हे ही वाचा:

“बांगलादेशातील हिंदूंना मृत्यूला सामोरं जावं लागतंय”

जामा मशिद परिसरात शुक्रवारच्या नमाजापूर्वी रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडी तैनात

फडणवीस, शिंदे, अजित पवारांची अमित शहांशी चर्चा

ममता बॅनर्जी यांचा ‘या’ मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला पाठींबा!

झारखंडमधील मतदानाच्या टक्केवारीबद्दलही त्यांनी सांगितले की, झारखंडमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालले तर, महाराष्ट्रात सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असते. झारखंडमध्ये बहुतेक ग्रामीण भाग असल्यामुळे तिथे सकाळीच मतदान करण्यावर भर दिला जातो. मात्र, महाराष्ट्रात सायंकाळी पाच नंतरही अनेक मतदार बाहेर पडून मतदान करतात. तसेच झारखंडमध्ये केवळ ३० हजार मतदान केंद्रे होती, तर महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक मतदान केंद्र उभारण्यात आली होती, असेही ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा