देशातील गरजू कारागीर आणि शिल्पकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा अनेक घटकांना फायदा होत आहे. मध्य प्रदेशातील नीमच येथील राजाराम प्रजापती यांनी या योजनेतून लाभ मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. कुंभार असलेल्या राजाराम प्रजापती यांच्या मते, त्यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत ₹५०,००० चे कर्ज घेतले होते. त्याचबरोबर त्यांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षणही मिळाले, ज्यामुळे ते मातीच्या भांड्यांची मशीन आणि इतर साहित्य खरेदी करू शकले.
ग्वालटोली येथील रहिवासी राजाराम प्रजापती यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले की, मातीचे काम त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. यापूर्वी त्यांचे वडील आणि आजोबाही हेच काम करत होते. या योजनेच्या माध्यमातून त्यांना ₹५०,००० चे कर्ज मिळाले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला.
हेही वाचा..
हमासला पैसे पुरवणाऱ्याचा खात्मा?
हरियाणातील तरुणांनी काय चंग बांधलाय बघा!
जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला; एक घुसखोर ठार
त्यांनी सांगितले की, पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत मातीची भांडी आणि खेळणी तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले गेले होते. या योजनेतून मिळालेल्या मदतीबद्दल मी पंतप्रधान मोदींचे मन:पूर्वक आभार मानतो, असेही त्यांनी नमूद केले. खरं तर, या योजनेचा मुख्य उद्देश पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. देशातील गरीब कारागीरांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ डिसेंबर २०२३ रोजी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची सुरूवात केली होती. या योजनेअंतर्गत बेरोजगारांना प्रशिक्षण, कर्ज, रोजगार आणि स्वरोजगाराच्या संधी दिल्या जात आहेत. या योजनेत सरकारतर्फे सुतार, लोहार, सोनार, कुंभार, दरजी, न्हावी, मोची, मूर्तिकार, खेळणी बनवणारे अशा विविध पारंपरिक व्यवसायांशी संबंधित हजारो लोकांना आर्थिक मदत व कौशल्यविकास प्रशिक्षण दिले जात आहे.