अयोध्येतील राममंदिरात रामललाच्या अभिषेकाची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अंतराळातून भव्य राम मंदिराची झलक दाखवली आहे. इस्रोने आपल्या स्वदेशी उपग्रहांचा वापर करून ही छायाचित्रे घेतली आहेत.
२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील अनेक दिग्गज मंडळींना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.देशभरातील भाविकांकडून दिवाळी साजरी करण्यात येत आहे.देशातील नागरिक उद्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.सोहळ्यासाठी अयोध्यानगरी फळे-फुले आणि लाईटने सजली आहे.सोशल मीडियावर अयोध्येतील फोटो देखील येत आहेत.आता सोशल मीडियावर राम मंदिराचा सॅटेलाईट फोटो व्हायरल झाले आहेत.
राम मंदिर अंतराळातून कसं दिसते हे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा:
दिल्ली एम्सचा यु-टर्न, २२ जानेवारीला अर्धा दिवस ओपीडी बंदचा निर्णय मागे!
ओवेसी लवकरच रामभक्त होतील अन ‘राम-नामाचा’ जप करतील!
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्या कारसेवेला हजर असल्याचा सादर केला पुरावा!
सुशांतसिंह राजपूत आज ३८ वर्षांचा असता;बहिणीने नव्या पुस्तकातून जागवल्या आठवणी!
इस्रोने आपल्या स्वदेशी उपग्रहांचा वापर करून अयोध्येतील राम मंदिराचा सॅटेलाइट फोटो शेअर केला आहे.सध्या अंतराळात ५० हून अधिक उपग्रह आहेत आणि त्यापैकी काहींचे रेझोल्यूशन एक मीटरपेक्षा कमी आहे. हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरद्वारे ही छायाचित्रे संकलित करण्यात आली आहेत. स्वदेशी कृत्रिम उपग्रहाद्वारे घेतलेल्या या फोटोंमध्ये अयोध्येत २.७ एकर जागेवर बांधलेले नवीन मंदिर दाखवण्यात आलं आहे. राम मंदिर स्पष्टपणे दिसण्यासाठी रिमोट सेन्सिंग कृत्रिम उपग्रहातून काढलेले छायाचित्र तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठे करण्यात आले आहे.
या सॅटेलाइट फोटोंमध्ये दशरथ महाल आणि सरयू नदी स्पष्टपणे दिसू शकते. याशिवाय अयोध्येचे रेल्वे स्टेशनही दिसते. अयोध्येत निर्माणाधीन राम मंदिराची ही छायाचित्रे गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी घेण्यात आली होती. मात्र, तेव्हापासून अयोध्येत दाट धुक्यामुळे स्पष्ट छायाचित्रे काढणे कठीण झाले होते.परंतु इस्रोने पाठविलेल्या छायाचित्रांमध्ये आता राम मंदिर स्पष्ट दिसत आहे.