आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) नऊ महिने राहून भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी पृथ्वीवर सुखरूप परतले. काही दिवसांच्या मोहिमेसाठी त्या अंतराळ स्थानकात गेल्या होत्या मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांचा मुक्काम तब्बल नऊ महिन्यांसाठी लांबला. या दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांनी भारताबद्दलही भाष्य केले आहे. तसेच त्या भारत दौराही करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अंतराळातून भारत कसा दिसतो याबद्दल सुनीता यांनी आपले विचार मांडले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेवरून परतल्यानंतर माध्यमांशी बोलताना, त्यांनी आपले अनुभव कथन केले.
भारताबद्दल बोलताना सुनीता म्हणाल्या की, भारत एक महान देश आहे आणि त्या लवकरच भारताचा दौरा करू शकते. जेव्हा सुनीता विल्यम्स यांना विचारण्यात आले की, भारत अंतराळातून कसा दिसतो तेव्हा त्या म्हणाल्या की, भारत अद्भुत दिसतो. जेव्हा जेव्हा अंतराळ स्थानक हिमालयावरून जात असे तेव्हा तेव्हा त्याचे अनोखे फोटो मिळत असत. हिमालय पर्वतरांगा अवकाशातून येणाऱ्या लाटांसारख्या दिसतात. अंतराळातून भारताकडे पाहिल्यास असे वाटते की, जणू मोठ्या शहरांपासून लहान शहरांपर्यंत प्रकाशाचे जाळे तयार झाले आहे.
सुनीता विल्यम्स पुढे म्हणाल्या की, त्यांना त्यांच्या वडिलांच्या मायदेशी परत येण्याची इच्छा आहे. अॅक्सिओम मिशनसह भारतीय अंतराळवीर अंतराळात जाण्याबद्दल त्या खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, भारत हा एक महान देश आणि एक अद्भुत लोकशाही आहे. भारताने अंतराळ क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. भारत गगनयान मोहिमेद्वारे अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याची तयारी करत आहे.
हे ही वाचा :
दिलासादायक! व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर ४१ रुपयांनी स्वस्त
जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना घेरले, चकमक सुरु!
मुरलेल्या फडणवीसांना पक्के ठाऊक आहे, चर्चेतील नाव यादीत नसते…
ममता जी ‘कौन सा धर्म गंदा है’?
सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात ३२२ दिवस घालवले. सुनीता विल्यम्स यांचा दौरा फक्त आठ दिवसांचा होता. मात्र, बोईंग अंतराळयानात बिघाड झाल्यामुळे ते रिकामे पृथ्वीवर परत आले. नऊ महिन्यांनंतर, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परत येऊ शकले. सुनीता विल्यम्स यांचा जन्म १९६५ मध्ये अमेरिकेतील ओहायो येथे झाला. त्यांचे वडील दीपक पंड्या गुजरातचे आहेत. त्यांची आई स्लोव्हेनियन वंशाची आहे. दीपक यांचा जन्म भारतात झाला आणि १९५७ मध्ये ते वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेला गेले. २००७ आणि २०१३ च्या अंतराळ मोहिमांनंतर सुनीता विल्यम्स यांनी भारताला भेट दिली होती.