32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषराजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला?, समितीचा अहवाल आला समोर!

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला?, समितीचा अहवाल आला समोर!

शासनाकडून राजकोट येथे उभारण्यात येणार शिवरायांचा ६० फुटी पुतळा

Google News Follow

Related

सिंधुदुर्गातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मागील महिन्यात कोसळला होता. या घटनेवरून सर्व स्तरावरून संताप व्यक्त करत सरकारवर टीका करण्यात आली होती. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. या दुर्घटनेची सरकारसह स्वतः पंतप्रधान मोदींनी माफी मागीतली होती. या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप झाले. दरम्यान, या संदर्भात घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आले नसल्याचे समितीने अहवालातून स्पष्ट केले आहे.

भारतीय नौदलाचे कमोडोर पवन धिंग्राच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या पाच सदस्यीय चौकशी समितीने १६ पानी अहवाल सादर केला. शिवरायांचा पुतळा कोसळण्याचे मुख्य कारण या समितीने अहवालात नमूद केले आहे. शिवरायांचा पुतळा उभारल्यानंतर व्यवस्थित देखभाल झाली नाही, त्यामुळे काही ठिकाणी पुतळ्याला गंज चढला होता. तसेच अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग देखील मारण्यात आले होते. यासह पुतळ्याचे डिझाइन योग्य पद्धतीने करण्यात आले नसल्याचे समितीने म्हटले आहे.

हे ही वाचा : 

हिमाचलचे मंत्री विक्रमादित्यांना काँग्रेसने फटकारले

संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर

मुलाच्या अंत्यविधीसाठी सुरक्षा द्या! मृत अक्षय शिंदेच्या कुटुंबाचे शाह आणि फडणवीसांना पत्र!

झाशीच्या राणीच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या वक्फ बोर्डाचा प्रयत्न हाणून पाडला!

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांचाकडे हा अहवाल समितीने सादर केला आहे. यामध्ये पुतळा पडण्याची प्रमुख कारणे नमूद केल्याची माहिती आहे. दरम्यान, राजकोट येथे आता छत्रपती शिवरायांचा ६० फुटी पुतळा शासनाकडून  उभारण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा