नोकरीच्या नावाखाली पाकिस्तानात अडकलेल्या हमीदा बानो २२ वर्षानंतर भारतात परतल्या!

भारतात पोहोचू शकेन अशी आशा नव्हती, हमीदा बानो

नोकरीच्या नावाखाली पाकिस्तानात अडकलेल्या हमीदा बानो २२ वर्षानंतर भारतात परतल्या!

पाकिस्तानी यूट्यूबर वल्लीउल्लाह मारूफ आणि भारतीय ब्लॉगर यांच्या प्रयत्नांमुळे, दोन दशकांपूर्वी कराचीला तस्करी करण्यात आलेल्या ७५ वर्षीय हमीदा बानो अखेर भारतात परतल्या. “मी माझ्या आयुष्यातील २२ वर्षे जिवंत प्रेतासारखी घालवली, मी कधीही भारतात पोहोचू शकेन अशी आशा नव्हती”, असे भारतात परतलेल्या हमीदा बानो यांनी म्हटले.

मुंबईतील कुर्ला येथे त्यांचे कुटुंब आहे. कुटुंबाची भेट झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. नवीन इमारती आणि गजबजलेल्या रस्त्यांमुळे त्यांचा कुर्ल्याचा परिसर गेल्या काही वर्षांमध्ये कसा बदलला आहे, हे हमीदाने यांनी पाहिले. त्या म्हणाल्या, मी एकटी आली असती तर मला माझे घर सापडले नसते. दरम्यान, सुदैवाने, दशके उलटूनही त्यांचे कुटुंब कुर्ल्यातील घरातून हलले नव्हते.

२००२ मध्ये एका रिक्रूटमेंट एजंटने त्यांना दुबईमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देऊन फसवले. दुबईऐवजी त्यांना पाकिस्तानच्या कराचीमध्ये पाठवण्यात आले. या ठिकाणी त्यांना संघर्षाचा सामना करावा लागला. बहुतेक वेळा त्यांनी रस्त्यावर आणि मशिदींमध्ये आश्रय घेतला. काही काळ त्यांनी जगण्यासाठी एक छोटेसे दुकान चालवले.

हमीदा बानो यांनी पुढे सांगितले की, कराचीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत दुसरे लग्न केले. पण कोरोना संसर्गाने त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून आपल्या सावत्र मुलासोबत राहत असल्याचे त्यांनी सांगितले. याच काळात पाकिस्तानी यूट्यूबर वल्लीउल्लाह मारूफ याची भेट त्याला संपूर्ण माहिती सांगितली. यानंतर त्याने हमीदा बानो यांची मुलाखत घेतली आणि भारतीय दर्शकांची मदत घेऊन तिची कथा ऑनलाइन शेअर केली. मुंबईचा ब्लॉगर खुल्फान शेख याने हा व्हिडीओ पाहिला आणि त्याने कुर्ल्यातील हमीदा यांच्या कुटुंबाचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हे ही वाचा : 

“मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो”

अमोल कीर्तीकरांना न्यायालयाचा दणका; रवींद्र वायकारांची खासदारकी कायम!

राहुल गांधींमुळे झाली दुखापत; जखमी भाजपा खासदाराचा आरोप

कुशीनगरमध्ये मदनी मशिदीचे मोजमाप सुरू, बेकायदा बांधकामाचा आरोप!

हमीदा बानोच्या कराचीमध्ये हजेरी असल्याची माहिती मिळाल्यावर इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी वलीउल्लाह मारूफ यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यामार्फत हमीदा बानो यांच्याशी चर्चा केली. यानंतर इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी हमीदा बानोशी संबंधित कागदपत्रे जसे की छायाचित्रे, मुंबईतील शिधापत्रिका, हमीदा बानोच्या दोन मुलींचे आधार कार्ड इत्यादी परराष्ट्र मंत्रालयाशी शेअर केले.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हमीदा बानो या पाकिस्तानी नागरिक नसल्याची पुष्टी केली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पोलीस निरीक्षक, गुप्तचर विभाग आणि सीआयडी मुंबईच्या अहवालाच्या आधारे हमीदा बानो ही भारतीय नागरिक असल्याचे सांगितले.

यानंतर, १८ ऑक्टोबर २०२४ रोजी, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांमार्फत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून हमीदा बानोच्या भारतीय नागरिक म्हणून स्थितीची पुष्टी केली. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी हमीदा बानो यांनी सीमा ओलांडली आणि तब्बल २२ वर्षांनी आपल्या देशात परतल्या.
Exit mobile version