‘तेल्याचा मुलगा राम मंदिराचे उद्घाटन कसे करू शकतो?’ असा प्रश्न उपस्थित करून तृणमूल नेते पिजुष पांडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पिजूष हे ब्राह्णण आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी शेअर करून जातीयवादी टिप्पणी करणाऱ्या पांडा यांच्यावर टीका केली आहे.
या सभेत पांडा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. ते लहानपणी रेल्वे स्थानकावर चहा विकत होते, याचा मला कोणी पुरावा दिल्यास मी राजकारण सोडायला तयार आहे, असेही आव्हान त्यांनी दिले. पांडा हे मोदी यांना निव्वळ फसवणूक करणारा असे संबोधले आहे. त्यांचे प्रमाणपत्रही कम्प्युटाइराइज्ड आहे. जेव्हा कम्प्युटर अस्तित्वातही नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांची पदवी खोटी असल्याचा दावा करणारे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला होता.
तेली जातीचे असूनही राम मंदिराचे उद्घाटन करणाऱ्या पंतप्रधानांना लक्ष्य केले. पंतप्रधानांसारख्या ओबीसी व्यक्तीने बूट पॉलिश केले पाहिजेत, असेही त्यांनी सुचवले. ‘तेली राम मंदिराचे उद्घाटन करत असतील, तर ब्राह्णणांना बूट पॉलिश कराय लागतील,’असे विधान त्यांनी केले. ‘ राम मंदिराचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी झाले. आता एक ब्राह्णण म्हणून मला कोंटाई बसथांब्यावर काही दिवस बूट पॉलिश करावे लागतील,’ असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
ओवैसींना आला मुख्तार अन्सारीचा उमाळा
‘निवडणूक रोख्यांवर टीका करणाऱ्यांना लवकरच पश्चाताप होईल’
जलपैगुडीतील वादळात पाच ठार, ५०० जखमी!
राम मंदिर अपूर्णावस्थेत असताना त्याच्या उद्घाटनाचा घाट घालण्यात आला. हिंदू धर्मात असे होऊ शकत नाही, असे चार शंकराचार्यांनी म्हटले असल्याचा दावाही त्यांनी केला. ‘नरेंद्र मोदी हे अहंकारी आहेत. ते तेली जातीचे आहेत. ते राम मंदिराचे उद्घाटन करून पूजाअर्चा कसे करू शकतात? आणि ब्राह्मणांना याचे साधे निमंत्रणही दिले जात नाही. मग ब्राह्मणांच्या जानव्याला अर्थ काय? मी माझे जानवे पंतप्रधान कार्यालयात पाठवून देत आहे आणि कोंटाय सेंट्रल बसथांब्यावर बूट पॉलिश करायला बसतो,’ असे ते म्हणाले.
भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी पांडा यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. ते पंतप्रधान मोदी यांचा तेल्याचा मुलगा म्हणून उल्लेख करून केवळ त्यांचा अपमान करत नसून त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अवमान केला आहे. ओबीसी समाजातील व्यक्तींनी बूट पॉलिश करण्याचे काम करावे, असेच त्यांना सुचवायचे आहे,’ असा दावाही अधिकारी यांनी केला.