29 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषबीबीसीला अतीक अहमदबद्दल सहानुभूती, ठरवले रॉबिनहूड

बीबीसीला अतीक अहमदबद्दल सहानुभूती, ठरवले रॉबिनहूड

अतीक अहमद : माफिया डॉन ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्याची हत्या हा अहवाल

Google News Follow

Related

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर २००२च्या गुजरात दंगलीचा ठपका ठेवत माहितीपट प्रसारित करणाऱ्या ब्रिटिश ब्रॉडकास्ट कंपनीला (बीबीसी) नामचीन गुंड आणि लोकप्रतिनिधी अतीक अहमदमध्ये रॉबिनहूडची छबी दिसली आहे. अतीक अहमदच्या हत्येच्या निमित्ताने तयार केलेल्या एका अहवालात अतीक अहमदच्या दहशतीपलिकडील पैलूंवर प्रकाश टाकून त्याच्याप्रती सहानुभूती व्यक्त होईल, अशी भूमिका घेतली गेली आहे.

१६ एप्रिलला ब्रिटनमधील या राष्ट्रीय प्रसारण संस्थेने अहवाल सादर केला. त्या अहवालाचा मथळा होता अतीक अहमद : माफिया डॉन ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्याची हत्या. गीता पांडे यांनी हा अहवाल लिहिला होता. प्रारंभी या अहवालात अतीक अहमदची कशी हत्या झाली यावर भर दिला पण नंतर त्याच्याबद्दल सहानुभूती वाटेल असे लेखन करण्यात आले.

६० वर्षीय अतीक अहमद प्रयागराजमधील गरीब कुटुंबात जन्मला होता. त्याने शाळा अर्धवट सोडली. त्यात असेही नमूद करण्यात आले की, गँगस्टर अतीक अहमद हा एकप्रकारे गरिबांसाठी रॉबिनहूड होता. तो गरिबांवर पैसे मोठ्या प्रमाणावर खर्च करत असे. त्यांच्या लग्नकार्यासाठी, ईद सणाच्या निमित्ताने तो पैशांची मदत करत असे. गरीब महिलांच्या मुलांना शाळेचे गणवेश आणि पुस्तके तो वितरित करत असे.

हे ही वाचा:

अतिक हत्याकांडाचा एसआयटी तपास करणार

घटलेल्या खत आयातीचा अनुदान कपातीला होणार फायदा

सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नाशिकच्या चांदीच्या गणपतीचे दागिने लंपास

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा उष्माघातातील मृतांमध्ये आठ महिला, तीन पुरुष

या अहवालात असेही म्हटलेले आहे की, अतीकचा मुलगा असद अहमद याला पोलिसांकडून कसा त्रास दिला गेला. असदच्या एन्काऊंटरबद्दलही बीबीसीने शंका उपस्थित केली. गुरुवारी १९ वर्षीय असद आणि त्याचा सहकारी गुलाम यांना पोलिसांनी कथित एन्काऊंटरमध्ये मारले. त्यांच्या या एन्काऊंटरबद्दल शंका व्यक्त केली जात आहे, असे बीबीसीने म्हटले आहे. या अहवालात अतीकच्या हत्येमुळे प्रयागराजचे रस्ते कसे ओस पडले असा उल्लेख करत त्याला एक मुस्लिम संदर्भ जोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

रविवारी सकाळी प्रयागराजमधील अनेक ठिकाणी शांतता होती. रमझानच्या महिन्यात एरवी प्रचंड गर्दी असते पण यावेळी बाजारपेठा ओस पडल्या होत्या. त्यात एका मुस्लिम व्यक्तीच्या वक्तव्याचा दाखला देत या हत्येमागे इस्लामविरोधी काही दृष्टिकोन आहे का? तो ४० वर्षीय मुस्लिम व्यक्ती बीबीसीशी बोलताना म्हणतो की, अतीक अहमद मुस्लिम असल्यामुळे त्याची हत्या झाली का. खरे असेल की नाही माहीत नाही पण या घटनेमुळे शहरात तणाव आहे. बीबीसीआने आणखी एक असाच लेख प्रकाशित केला असून त्यातही अतीकच्या दहशतीवर भर न देता त्याच्या इतर पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रसारमाध्यमे आणि पोलिस असताना एकाची अशी हत्या कशी काय होऊ शकते, असा सवाल या लेखात उपस्थित करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा