मणिपूरमधील एका दहा वर्षीय मुलीचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्या मुलीने कोणताही विक्रम केला नाही,मात्र एवढ्या लहान वयात उत्तम जबाबदारीचे उदाहरण तिने सगळ्यांसमोर ठेवले आहे. मोठ्या लोकांनाही सलाम करणे भाग पडेल असे काम ही लहानगी करत आहे.
ही दहा वर्षीय मुलगी तिच्या अवघ्या दोन वर्षाच्या भावाला शाळेत घेऊन जाते. मीनिंगसिन्लिउ पामेई (१०) असे या मुलीचे नाव असून इयत्ता चौथीमध्ये शिकते. मीनिंगसिन्लिउ तिच्या कुटुंबासह उत्तर मणिपूरच्या तामेंगलाँग जिल्ह्यात राहते. या लहान मुलीचे आई वडील शेतात दिवसभर काम करतात. त्यामुळे तिच्या लहान भावाची काळजी मीनिंगसिन्लिउच्या आईवडिलांना घेता येत नाही. आणि त्यामुळे त्या लहान बाळाची जबाबदारी मीनिंगसिन्लिउवर येते. मात्र लहान भावाची काळजी घेत असताना तिच्या शिक्षणावर याचा परिणाम होऊ नये म्हणून ती तिच्या २ वर्षांच्या भावाला घेऊन शाळेत जाते.
मीनिंगसिन्लिउ तिच्या लहान भावाला मांडीवर घेऊन वर्गात बसते. जेव्हा या मुलीचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला तेव्हा मणिपूरचे उर्जा, वन आणि पर्यावरण मंत्री बिस्वजित यांनी पामेई कुटुंबाला ट्विट करून मदतीची मागणी केली होती. बिस्वजित यांनी त्या लहान मुलीला मदत करण्यासाठी मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता.
हे ही वाचा:
केमिकल इंजीनियर अब्बासीने केला गोरखपूर मठाच्या सुरक्षा जवानांवर हल्ला
दोनच दिवसांत मुंबईची मेट्रो तीनवेळा बंद पडली
‘ठाकरे सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० ची मॅच सुरु’
तुरुंगात पडून अनिल देशमुखांच्या खांद्याला इजा
तसेच मीनिंगसिन्लिउ पदवीपर्यंतचे शिक्षण फक्त ११२ रुपयांत करण्याचे आश्वासन बिस्वजित यांनी दिले आहे. तसेच मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी तिच्या कुटुंबाला तात्काळ रेशन सेवा पाठवली आहे. त्याशिवाय एका संस्थेने तिच्या कुटुंबाला दहा हजार रुपयांची मदत केली आहे.