मुंबईतील या घरांचे काम पुरते रखडले!

मुंबईतील या घरांचे काम पुरते रखडले!

कोरोना काळानंतर मुंबईतील अनेक व्यवसायांना घरघर लागली. त्यातलाच एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे बांधकाम व्यवसाय. कोरोना काळात आर्थिक अडचणींना अनेक उद्योगांना सामना करावा लागत आहे. सध्याच्या घडीला मुंबईतील अनेक घरांचे काम ठप्प झाले आहे.

कामगारांच्या तुटवड्यामुळे मुंबईतील अनेक बांधकामे अपूर्ण आहेत. तसेच इतर आर्थिक अडचणींचा पाढाही आहेच. त्यामुळेच आता मुंबईतील अनेक गृहप्रकल्प रेंगाळले आहेत. अदमासे दीड लाख घरांचे काम खूपच संथगतीने चालले आहे. ४१ हजार घरांचे काम बंद पडले आहे.

एनरॅक या सल्लागार कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैद्राबाद, कोलकत्ता आणि चेन्नई या सात शहरांच्या अभ्यासावरूनच हे चित्र आता सहज स्पष्ट झाले आहे. सात शहरांमधील काही महत्त्वाच्या बाबींवरूनच आता मुंबईतील जवळपास ४१ हजार ७२० घरांचे काम पूर्ण बंद झाले आहे. सात शहरांतील ६ लाख २४ हजार घरांचे काम रखडले आहे. काम रखडलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर दिल्ली हे शहर असून, द्वितिय क्रमांक मुंबईचा आहे.

हे ही वाचा:

अमित शहा-शरद पवार भेटीचे दरेकरांनी काय कारण सांगितले?

ठाकरे सरकार विरोधात व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

शरद पवारांनी का घेतली अमित शहांची भेट?

ऑलिम्पिकपटू तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबियांचा शेजाऱ्यांकडून छळ

या रखडलेल्या घरांचे काम २०१४ मध्ये सुरू झाले होते. शिवाय या घरांचा ताबा कोरोना येण्यापूर्वीच मिळायला हवा होता. परंतु तसे झाले नाही, कोरोनानंतर मात्र सर्वच चित्र पालटले. आर्थिक अडचणी, निधी कमतरता अशा अनेक कारणांमुळे प्रकल्पांवर गंडातर आले. तसेच अनेक प्रकल्प हे कामगारांविना अपूर्ण आहेत. या सर्व घडामोडीत ग्राहकांना घर मिळण्यास अजून किती विलंब लागणार यावर कुठेलच उत्तर विकासकाकडे नाही. तसेच विकासकाचे कंबरडे आर्थिक तंगीमुळे चांगलेच मोडले असल्यामुळे, दुसरा कुठल्याही प्रकल्पात विकासकांना हात घालणे आता मुश्कील झालेले आहे.

Exit mobile version