या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमुळे घरं सील…

या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमुळे घरं सील…

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागल्यामुळे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पालिकेची चिंता आणखी वाढली आहे. अशात औरंगाबादेत कोरोना बाधित रुग्णांची घरे सील होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. घर सील करून घरावर स्टिकर लावण्यास सुरुवात करण्यात येणार असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही सुरवात होणार आहे. अशी माहिती औरंगाबाद महापालिकेकडून देण्यात आली आहे.

कोरोनाची लस आल्यामुळे सर्व काही पूर्वीसारखे सुरू झाले होते. पण आता कोरोनाचा धोका पुन्हा वाढताना दिसत आहे. यामुळे औरंगाबद पालिका आता सक्रिय झाली असून नागरिकांनाही कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने फैलावत आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का अशा चर्चांना आता उधाण आले आहे. पण हा शेवटचा पर्याय असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधी निर्णय घेतील अशी माहिती आहे.

हे ही वाचा:

मुंबईतील हे चार वॉर्ड हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढायला लागल्यामुळे नाशिक प्रशासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यात लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता लग्नाला फक्त १०० लोकच उपस्थित राहू शकतील. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी हे आदेश काढले आहेत. तसेच आगामी काळात हे निर्बंध अजून कठोर होऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

Exit mobile version