२२ वर्षांपूर्वी आलेल्या गदरच्या सिक्वेलवर लोकांच्या उड्या !

पाच दिवसांत २२८.५८ कोटी कमाई

२२ वर्षांपूर्वी आलेल्या गदरच्या सिक्वेलवर लोकांच्या उड्या !

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर- २’ चित्रपटाने उल्लेखनीय कामगीरी करत बॉक्स ऑफिसवर पाच दिवसांत २२८.५८ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.’गदर: एक प्रेम कथा’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित सिक्वेल असलेल्या या चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसापासूनच चांगली कमाई करताना दिसत आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर- २’ सिक्वेल १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला.सनी देओल आणि अमिषा पटेल प्रमुख भूमिकेत आहेत. पहिल्या दिवसापासूनचं गदर- २ चित्रपट चांगली कमाई करत असून पाच दिवसात २२८.५८ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.सनी देओलच्या ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपटात जी स्टाईल,अॅक्शन होती तीच गदर- २ मध्ये पाहायला मिळत आहे.तिकीट काढण्यासाठी लोक सिनेमागृहात रांगा लावत आहेत. सनी देओलच्या गदर- २ चित्रपटाला लोकांची पसंती असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा:

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे कार्य करू!

भारतीय वंशाच्या निशा अमेरिकी वित्तसंस्थेच्या महत्त्वाच्या पदावर

अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व बहाल !

मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला

सनी देओलचा पहिला ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपट लोकांच्या अजूनही स्मरणात आहे. त्यावेळी चित्रपटात असणारे उच्चार, सनीची स्टाईल,अॅक्शन अत्यंत देखणीदार होती. ‘गदर: एक प्रेम कथा’चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनीच केले होते. हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले होते.तेव्हाही हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहाबाहेर रांगा लागल्या होत्या.अक्षरशः जास्त पैसे देऊन चित्रपटाचे तिकीट बुक करून पाहायला जात होते. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर: एक प्रेम कथा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा ‘गदर- २’ हा सिक्वेल आहे. या चित्रपटाला देखील प्रेक्षक तेवढेच भरभरून प्रेम देत आहेत.

एकीकडे काळ बदलल्याने बॉलीवूडचे चित्रपटही तितकेसे छाप पाडू शकले नाहीत.मात्र, तब्बल २२ वर्षानंतर सनी देओलचा ‘गदर- २’ चित्रपट प्रदर्शित झाला. सनी देओलने आपल्या अभिनयाच्या जोरावर पुन्हा २२ वर्ष मागे घेऊन गेला. सनी देओलची तीच ऊर्जा,तोच उत्साह ‘गदर- २’ चित्रपटात पाहायला मिळाला. १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने पाच दिवसात आतापर्यंत २२८.५८ कोटी रुपयांचा गल्ला जमावाला आहे.

Exit mobile version