उपाहारगृहे, हॉटेलात ४ नंतर कोरोनाची भीती?

उपाहारगृहे, हॉटेलात ४ नंतर कोरोनाची भीती?

राज्यातील निर्बंधांत करण्यात आलेल्या नव्या बदलांमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दुकाने रात्री १० पर्यंत खुली असतील पण हॉटेल्स दुपारी ४ पर्यंतच खुली राहणार आहेत.

दुकानांप्रमाणेच उपाहारगृहांसाठीही परवानगी मिळेल, अशी अपेक्षा उपहारगृह व्यावसायिकांना होती. परिणामी, उपाहारगृह व्यावसायिकांकडून सरकारवर नाराजी आणि टीका व्यक्त केली जात आहे. ‘दुपारी चार पर्यंत उपहारगृह खुली असली तरी तेवढ्या वेळात दहा टक्केही व्यवसाय होत नाही. उपहारगृहांमध्ये रात्रीच्या वेळी अधिक ग्राहक येत असतात, त्यामुळे दिवसा उपहारगृह चालू ठेऊनही कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतकाही व्यवसाय होत नाही. इतर कर, देयके हे सुद्धा आहेतच; त्यामुळे हा व्यवसाय कायमचा बंद पाडण्यासाठी सरकार हे असे नियम बनवत आहे का’ असा प्रश्न उपहारगृह व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्यातील ११ जिल्हे वगळून अन्य भागातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असल्यामुळे राज्य सरकारने इतर जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारबरोबरच मुंबई महापालिकेने टाळेबंदीचे निर्बंध शिथिल केले आहेत.  व्यापार – उद्योगांना चालना देण्यासाठी दुकाने रात्री दहा पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. परंतु उपाहारगृहांसाठी जुनेच नियम कायम ठेवण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

आपण यांना पाहिलंत का?

अफगाणिस्तानात शांतीसेना जाणार?

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे वाहनप्रवास होणार अधिक सुरक्षित

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे निधन

“नवीन नियमावली पाहून दुःख वाटण्यापेक्षा धक्का जास्त बसला. गेल्या दीड वर्षात सरकारने हॉटेल व्यावसायिकांचा जराही विचार केला नाही. करामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत दिलेली नाही. व्यवसाय बंद करण्याची वेळ हॉटेल मालकांवर आलेली आहे.” अशा शब्दात हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी आपले मत व्यक्त केले.

Exit mobile version