सध्याच्या स्थितीला राज्यातील निर्बंधजाचामुळे उपाहारगृहे तसेच हॉटेल व्यवसाय हा चांगलाच संकटात सापडलेला आहे. टाळेबंदीला कंटाळून गेल्या काही दिवसांपूर्वी विरार भागातील एका हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केली. त्यामुळेच आता हॉटेल व्यावसायिक पुरते कंटाळले आहेत.
गेले दीड वर्षे महाराष्ट्रातील टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय बुडाले. केवळ इतकेच नाही तर, निर्बंधजाचामुळे व्यापारी अक्षरशः हवालदिल झालेले आहेत. कोरोना काळात हलाखीच्या परिस्थितीत ४० टक्के म्हणजेच सुमारे ३० हजार उपाहारगृहे, धाबे टाळेबंदीच्या निर्बंधामध्ये कायमस्वरूपी बंद पडले आहेत. याकरता आर्थिक मदतीची मागणी संघटनेने सरकारकडे केली होती. तसेच किमान परवाना शुल्कात ५० टक्के सूट मिळायला हवी, अशी मागणी करण्यात आली होती.
सध्या उपाहारगृहे सुरु आहेत परंतु केवळ सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंतच. त्यानंतर केवळ घरपोच सेवा देण्यात येत आहे. धंद्यामध्ये मोठे आर्थिक नुकसान होत असल्यामुळेच, मुंबईतील जवळपास ४० टक्के उपाहारगृहे कायमस्वरूपी बंद झालेली आहेत. यामध्ये पोळी भाजी केंद्र यासारख्या घरगुती उद्योगांवरही गंडांतर आलेले आहे. त्यामुळेच आता उपाहारगृहांची वेळ वाढवावी अशी मागणी व्यावसायिकांकाडून जोर धरत आहे.
हे ही वाचा:
राज्यातील रस्ते आले ‘रस्त्यावर’
असे काय झाले की नांदिवली संतापली?
एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?
मुंबई शहर आणि उपनगरात याक्षणाला जवळपास ७५ हजार लहानमोठे उपाहारगृहे आहेत. यामध्ये कोरोना काळात हलाखीच्या परिस्थितीत ४० टक्के म्हणजेच सुमारे ३० हजार उपहारगृह, धाबे टाळेबंदीच्या निर्बंधामध्ये कायमस्वरूपी बंद पडले आहेत.
अनेक उपाहारगृहे बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या घटकांनाही बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. ३० हजार उपहारगृहातील तीन लाख कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. इतकेच नाही तर या उपाहारगृहांना मालाचा पुरवठा करणारे उद्योगही आता बुडाले आहेत. त्यामुळे या उद्योगांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.