23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषअपघात झाल्यावर तो रेल्वेतील पंख्याला लटकला होता...

अपघात झाल्यावर तो रेल्वेतील पंख्याला लटकला होता…

जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची याचना सुरु होती. मदत मागितली जात होती. प्रवाशांकडे पाहवत नव्हते.

Google News Follow

Related

ओदिशात बालासोर येथे झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या झालेल्या भीषण अपघातानंतर त्यातील प्रवाशांचा कहाण्या आता समोर येऊ लागल्या आहेत. त्यातील एका प्रवाशाने आपल्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला आहे. त्याने आपले नाव जाहीर केले नसले तरी त्याची कहाणी अपघाताचे गांभीर्य दाखविणारी आहे.

 

मी शालिमार ते चेन्नई असा प्रवास करत होतो. अपघात झाला तेव्हा मला झोप लागली होती. खूप जोरजोरात आवाज येत असल्याचे ऐकून मला जाग आली. तेव्हा लक्षात आले की काहीतरी भयंकर घडले आहे. माझी सीट वरच्या बाजूस होती. त्यावेळी मी साईटवरील पंखा धरून बसलो होतो. ट्रेन सुरूच होती. लोक ओरडत होते, वाचवा वाचवा असे शब्द कानावर पडत होते…असा अनुभव कथन केला आहे अपघातातून वाचलेल्या एका प्रवाशाने.

 

ट्रेन थांबायची आम्ही वाट बघत होतो. काही वेळाने ट्रेन थांबली. ट्रेन मधून बाहेर पडल्यानंतर सर्व प्रवासी इकडे – तिकडे पळत होते. अंधार होता. काय सुरु आहे, याबाबत काहीच पत्ता नव्हता. अपघात झाला आहे, हे लक्षात आले होते. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची याचना सुरु होती. मदत मागितली जात होती. प्रवाशांकडे पाहवत नव्हते. कारण त्यांची शारीरिक दुखापत बघवत नव्हती. अनेकांच्या हातापायाचे अक्षरशः तुकडे झाले होते. ट्रेनमधील प्रवासी एकमेकांना आधार देत होते. जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. आम्ही खूप घाबरलेल्या अवस्थेत होतो. आमच्या अंगाचे पाणी पाणी झाले होते. आमच्या परीने जे आम्हाला शक्य आहे, ती मदत आम्ही करत होतो.

हे ही वाचा:

भारताच्या गगनयान मोहिमेत अंतराळवीरांच्या मेनूत ‘इडली’ नाही

अमित शहांनी इशारा दिल्यानंतर मणिपूरचे बंडखोर आले शरण, १४० शस्त्रे परत

ओदिशातील अपघाताप्रमाणेच देशात अनेक अपघातांनी उडविली होती झोप

ओदिशात कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात; शेकडो लोक जखमी, ५० दगावल्याची भीती

 

 

आम्ही ट्रेनच्या एस ५ या डब्ब्यातून प्रवास करत होतो. तेव्हा आमचे जीव वाचवायला ही कोणी नव्हतं…आम्ही स्वत:च ट्रेनमधून बाहेर पडलो. खूप भयानक परिस्थिती होती. ट्रेनमधील प्रवासीच एकमेकांचे जीव वाचवत होते. आम्ही खूप घाबरलो होतो. काय करावं ते सूचत नव्हतं. आमच्या सीटच्या खाली एक दोन वर्षांचा मुलगा होता. पण, सुदैवाने त्याला काहीही झालं नाही. नंतर त्या मुलाला त्याच्या कुटुंबीयांकडे सुखरुप पोहोचवलं, असं म्हणत सुखरुप बचावलेल्या प्रवाशाने धक्कादायक अनुभव सांगितला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा